# परभणी महापालिका हद्दीसह परिसरात 14 ऑगस्टपर्यंत संचारबंदी.

परभणी: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी महानगरपालिका हद्द आणि 5 किमी परिसरात कलम 144 नुसार रविवार, 9 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2020 चे रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश परभणीचे जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत.

या संचारबंदीतेन सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी आणि त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने व वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेली वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवा, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक तसेच पेट्रोलपंप वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने आणि दूध विक्रेत्यांनी केवळ घरोघरी जावून सकाळी 6 ते 9 या वेळेत दूध विक्री करावी. राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल बँका, खाजगी बँका, नागरी सहकारी बँका केवळ रास्त भाव दुकानदार, पेट्रोल पंप चालक, गॅस वितरक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, कृषी सेवा केंद्र व कृषी साहित्य विक्री सेवा केंद्र, यांच्याकडून चलनाद्वारे पैसे भरणा करणे व बँकेची ग्रामीण भागात रोकड घेऊन जाणारी वाहने, खत कृषी बी बियाणे विक्री व वाहतूक त्यांची गोदामे आणि दुकाने यांच्यासाठी लागणारी वाहने व कामगार, महा ई सेवा केंद्र व सीएससी सेंटर यांना फक्त पीक विमा संबंधित कामाकरिता रात्री 8 वाजेपर्यंत सूट, आदी व्यक्ती व समूहाला सुट राहील.

वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवेशिवाय नागरी भागात इतर कोणतीही व्यक्ती अथवा वाहने रस्त्याने, बाजारात, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येणार आहे. असेही जिल्हादंडाधिकारी परभणी यांनी आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *