# ‘अण्णा भाऊ साठे कामगार मुक्त विद्यापीठा’ च्या संकल्पनेचे विमोचन.

औरंगाबाद:  येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात सोमवार, 10 ऑगस्ट रोजी “अण्णा भाऊ साठे कामगार मुक्त विद्यापीठा”च्या संकल्पनेचे विमोचन ॲड. जे.के. वासडीकर (अध्यक्ष, मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटी) यांचे हस्ते अनौपचारिक पद्धतीने शैक्षणिक व सामाजिक चर्चेसाठी करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सदस्य ॲड. श्रीकांत अदवंत व प्रभारी प्राचार्य डॉ. एस.जी. सिरसाट यांची उपस्थिती होती. या प्रसंगी ही संकल्पना वास्तव स्वरूपात येण्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त “अण्णा भाऊ साठे कामगार मुक्त विद्यापीठ” स्थापणेची संकल्पना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकिशन मोरे यांची आहे. या संकल्पनेत प्रस्तावित अण्णा भाऊ साठे कामगार मुक्त विद्यापीठाची उद्दिष्टे, अभ्यासक्रम, घोषवाक्य, स्थापना आदी बाबत त्यांनी सविस्तर विचार व्यक्त केले आले आहेत. या संकल्पनेवर शैक्षणिक व सामाजिक चर्चा व विचार मंथन व्हावे आणि संकल्पित अण्णा भाऊ साठे कामगार मुक्त विद्यापीठ स्थापनेचा प्रवास सुरु व्हावा असा उद्देश आहे. ही संकल्पना पुस्तिका 9325228041 या व्हाट्स ॲप क्रमांकावर किंवा shrikishan01@gmail.com
या ईमेल वर मॅसेज पाठवून मिळवावी व त्या वर चर्चा घडवून आणावी, असे आवाहन प्रा. श्रीकिशन मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *