# विशेष मोहिमेत तिसऱ्या दिवशी बीडमध्ये २६६५ व्यावसायिकांची अँन्टिजन तपासणी, १३१ कोरोनाबाधित.

बीड:  शहरातील कोविड-१९ निदानासाठी झालेल्या विशेष मोहिमेत तिसऱ्या दिवशी ६ तपासणी केंद्रावर २६६५ व्यावसायिकांची कोविङ-१९ अँन्टिजन तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये १३१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

बीड शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशानुसार बीड शहरातील सर्व व्यावसायीक व कामगार यांची अँन्टिजन तपासणी करण्याकरीता नियोजन करण्यात आले होते. या तपासणीकरता सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती.

१.बलभिम महाविद्यालय, बीड
२.माँ वैष्णवीदेवी पॅलेस, एम.आय.डी.सी.रोड
३.जिल्हा परिषद शाळा, अशोक नगर,
४.राजस्थानी विद्यालय, विप्रनगर
५.चंपावती प्राथमिक शाळा, बुथ क्र.१ नगर रोड
६.चंपावती प्राथमिक शाळा, बुथ क्र.२ नगर रोड.

या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण ९४ कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. लागण झालेल्या १३१ नागरिकांना उपचाराकरीता हलविण्यात आले. सदर लोकांची तपासणी व निदान झाल्यामुळे इतर लोकांना होणारा प्रसार थांबविण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *