अंबाजोगाईसह परळी, आष्टी, धारूर, शिरुर तालुक्यातील गावांचा समावेश
बीड: जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यातील गावांसह विविध शहरातील एकूण १७ ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित करुन अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे .
परळी वैजनाथ तालुक्यातील दादाहरी वडगाव व नंदनज, गेवराई तालुक्यातील मादळमोही. परळी शहरातील बजरंग नगर, सावता माळी मंदिर व पद्मावती नगर.
अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी, जोगाईवाडी येथील साईसृष्टी, पोखरी रोड व सेलू आंबा या गावांमध्ये. अंबाजोगाई शहरातील गांधीनगर भाग-3 व सोनार गल्ली.
आष्टी शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील परिसर, धारूर शहरातील शिक्षक कॉलनी , शिनगारे गल्ली, उदय नगर व कटघरपुरा गल्ली.
शिरूर शहरातील सोनार गल्ली गांधी चौक ते इंदिरानगर या परिसरामध्ये सर्व संबंधित ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे, असे आदेशात नमूद केले आहे. वरील संबंधित परिसरात अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बीड तालुक्यातील मौजे काठोडा या गावात कंटेन्मेंट झोन घोषित:
बीड तालुक्यातील मौजे काठोडा येथे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बीड तालुक्यातील मौजे काठोडा या ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित करुन अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू केली आहे, असे सुधारित आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे.