# स्वातंत्र्यदिन दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण.

बीड, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, केज व आष्टी येथे लॉकडाऊनमुळे एकच मुख्य शासकीय ध्वजारोहण

बीड: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे होणार आहे.

तसेच बीड, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, केज व आष्टी या शहरांमध्ये जेथे लॉकडाऊन चालू आहे येथे एकच मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी तसेच जिल्ह्यातील सर्व ध्वजारोहण कार्यक्रमांसाठी निमंत्रिताशिवाय कोणीही कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित राहू नये अशा सूचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित उपविभागीय अधिकारी अथवा तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयाने ध्वजारोहणाचा समारंभ सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत आयोजित करु नये. एखाद्या कार्यालयाला किंवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावा.

कोविड-19 साथरोगाचा प्रार्दुभाव असल्याने स्वातंत्र्य सैनिक यांना ध्वजारोहणाचे निमंत्रण न देता त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ महसूल अधिकारी यांनी समक्ष भेट देऊन स्वतंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्याव्यात. शहीद जवानांच्या पत्नी, आई-वडिल, कोरोनायोध्दा, जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक, कोरोना आजारावर मात केलेल्या महिला आणि कोविड-19 कर्तव्य बजावत असतांना ज्या पोलीस कॉन्स्टेबल व नर्स यांचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या परिवारातील व्यक्ती अशा प्रकारे प्रत्येक संवर्गातील एक व्यक्ती प्रातिनिधीक स्वरुपात निमंत्रित करण्यात यावे आणि शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ सामाजिक अंतर पाळून जबाबदारीने साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोविड- 19 कोरोना साथरोगाचा प्रार्दभाव टाळण्यासाठी उपस्थितांनी मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, मोठा उत्सव साजरा करण्याचे टाळणे, सामाजिक अंतर ठेवणे आणि कोरोना साथरोगाचा प्रार्दुभाव होणार नाही याची दक्षता घेऊन सार्वजनिक व शासकीय इमारतीमध्ये (ग्रामीण भागामध्येसुध्दा) आणि ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारुन साजरा करण्यात यावा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *