# उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरणच्या 54 जनमित्रांचा गौरव.

पुणे:  सन 2019-20 मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या महावितरणच्या पुणे परिमंडलमधील उत्कृष्ट 12 यंत्रचालक व 42 तांत्रिक कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी (दि. 15) स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

महावितरणमधील उत्कृष्ट यंत्रचालक, तंत्रज्ञ या तांत्रिक कर्मचाऱ्यांना दरवर्षी महाराष्ट्र दिन व कामगार दिनी गौरविण्यात येते. मात्र, कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे यंदा हा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात आला. रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) कमांडर शिवाजी इंदलकर, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, प्रकाश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन उत्कृष्ट 54 जनमित्रांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त व लेखा) व सौ. ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), कार्यकारी अभियंता मधुकर घुमे, विष्णूकुमार पैठणकर, रवींद्र बुंदेले, संतोष गरूड आदींसह अधिकारी, कर्मचारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी केले.

पुणे परिमंडलातील उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुढीलप्रमाणे:
विशाल शिंदे, गणेश गायकवाड, पोपट सातपुते, पंकज टेकाम (बंडगार्डन विभाग), बालाजी तुडमे, अनिरुद्ध रणधीर, मच्छिंद्रा बोराडे, बालाजी महाजन (नगररोड विभाग), किशोर कुमावत, रवींद्र पाटील, राजेंद्र वैद्य, प्रमोद पवार (पद्मावती विभाग), राहुल तारू, संभाजी शेरकर, राजेंद्र शिंदे, संजय गेडाम (पर्वती विभाग), कुंडलिक काशिद, सुनील गायकवाड, राजेखान मुजावर, दयाराम तोंडिलकर, रसूल सय्यद (रास्तापेठ विभाग), प्रशांत बुरसे, कलाप्पा जबगौंडा, जालिंदर खरमाळे, दिलीप बंगाळे (भोसरी विभाग), भैरव वडणे, एकनाथ शेळके, अमरकुमार डोंगरे, किशोर भोयर (कोथरूड), रणजित जोगे, मिठ्ठू कुरलेकर, संदीप नांगरे, रमेश घनवट (पिंपरी विभाग), नंदकुमार सुतार, नीलेश पाटील, संदीप साबळे, ललीतकुमार शेळकांडे (शिवाजीनगर विभाग), रामचंद्र गभाले, संग्राम सांडभोर, अतुल बुरुडकर, दिलीप बांबळे, बाळासाहेब कंकान, गजानन घाडगे (मंचर विभाग), शैलेश कदम, गणेश ओव्हाड, जितेंद्र कोळी, संजय गोरड, नीलेश भोंडवे (मुळशी विभाग), समाधान पटाईत, बाळू कोतवाल, कैलास वाखरे, शरद आरुडे, विकास सुपे, संतोष जाधव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *