नांदेड: विजय होकर्णे
आज १९ ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिन, आजपासून १७७ वर्षा आधी १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. फ्रान्सने १८३९ ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनच्या रुपात साजरा करतात.
प्रकृतीने प्रत्येक प्राणी मात्राला जन्मत: एक कॅमेरा दिला आहे, ज्यामुळे ते प्रत्येक वस्तूच्या छवीला आपल्या डोक्यात अंकित करू शकते आणि तो कॅमेरा म्हणजे आपले डोळे. तस पाहिलं तर प्रत्येक प्राणी एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केली आणि अनेक आविष्कारासोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळेसोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थाई रुपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला आपण ‘फोटोग्राफी डे’च्या रुपात साजरा करतो.
हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले. जे शब्दात लिहिता येत नाही, जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, ते या छायाचित्रांच्या माध्यमातून न सांगता व्यक्त होत असते, छायाचित्रकार म्हणजे तो जो साधे दिसत असलेले दृश्यही बोलके करतो. या जागतिक छायाचित्र दिनी त्या सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा…