नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या वतीने दि. २४ व २५ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय “संगीत आणि रंगभूमी: पारम्परिकता व आधुनिकता’’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे या वेबिनारचे झूम अॅपद्वारे उद्घाटन करतील.
दिनांक २४ ऑगस्ट रोजी दु.१२ वाजता इंडियन माईम थीएटरचे संस्थापक पद्मश्री निरंजन गोस्वामी, कोलकत्ता तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ललित कला केंद्र विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे व डॉ. किशोर शिरसाठ, विभागप्रमुख, नाट्यशास्त्र विभागप्रमुख सरस्वती भुवन महाविद्यालय औरंगाबाद हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच २५ ऑगस्ट रोजी दु. १२ वाजता संगीत विषयासाठी डॉ. सॅम्पसन डेविड Ex. Joint Secretary, AIU, New Delhi, डॉ. अनिल ब्यवहार अधिष्ठाता व संगीत विभागप्रमुख, इंदिरा कला विश्वविद्यालय, खैरागढ, मध्यप्रदेश तसेच डॉ. कुणाल इंगळे माजी संगीत विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
तसेच प्रमुख उपस्थिती वैजयंता पाटील,अधिष्ठाता आंतरविद्या शाखा, यांची लाभणार आहे. तर अध्यक्षीय समारोप ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पी. विठ्ठल हे करतील. या वेबिनारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजक प्रा. कैलास पुपुलवाड (नाट्य विभाग) व डॉ. शिवराज शिंदे (संगीत विभाग) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ.पी. विठ्ठल, डॉ. कैलास पुपुलवाड ९९२२६५२२०५ व डॉ. शिवराज शिंदे ९०११९४५९९६ यांच्याशी संपर्क साधावा.