बीड: जिल्ह्यातील बीडसह माजलगांव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरांमधील सुशोभीकरणाचे साहित्य विक्री करणारी दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट यांना व इतर सर्व प्रकारच्या दुकानांना 23 आॅगस्ट पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविण कुमार धरमकर यांनी दिले आहेत. तसेच सर्वांनी कोविड-19 विषयक सर्व खबरदारी पाळूनच कामकाज करावे. तसेच कंटेन्मेंट झोनमधील परिसरातील निर्बंध तसेच कायम राहतील.
यापूर्वी बीड, माजलगांव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरांमध्ये २१ आॅगस्ट २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लाॅकडाऊन लागू करण्यात आले होते. सुशोभिकरणाचे साहित्य विक्री करणारी दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट व इतर सर्व प्रकारच्या सर्व दुकानांना उघडण्याच्या परवानगीबाबत लाॅकडाऊन नंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल, असे नमूद केले असल्याने हे स्वतंत्र आदेश दिले आहेत.