# अटल घन वन पथदर्शक वृक्ष लागवडीसाठी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचा पुढाकार.

अंबाजोगाई: पंचायत समिती येथे अटल घन वन वृक्ष या पथदर्शक वृक्ष लागवड अंतर्गत वृक्षारोपण व वृक्ष संगोपन हा उपक्रम तालुक्यातील सर्व कर्मचा-यांच्या सहकार्यातून पूर्ण करावयाचा आहे, असे आवाहन अंबाजोगाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.संदीप घोणशीकर यांनी कर्मचा-यांना केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत येथील शिक्षक मैत्री प्रतिष्ठान तर्फे रोख पाच हजार रूपयांची वर्गणी संकलित करून सहायक गटविकास अधिकारी श्री. कराड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार, सचिव उमेश नाईक, उपाध्यक्ष अनुरथ बांडे, सदस्य तथा क्रीडा संयोजक दत्ता देवकते, ज्येष्ठ मार्गदर्शक तथा स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेचे संचालक विष्णू बप्पा सरवदे, वैजनाथ अंबाड, जगन्नाथ वरपे आदींची उपस्थिती होती. यापूर्वीही शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत आंतरराष्ट्रीय महिला दिनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचा-यांचा सत्कार, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सर्व शिक्षक व कर्मचा-यांसाठी हँडवॉश ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचा-यांना फेसशील्डचे आणि गरजू कुटुंबांना धान्याचे कीट वाटप करण्यात आले. तसेच शिक्षकांचे पगार लवकर होण्यासाठी पगार प्रक्रियेतील टप्पे कमी करून गटशिक्षणाधिकारी यांच्या खात्यावरून थेट शिक्षकांच्या खात्यावर पगार प्रक्रिया सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. सेवानिवृत्त शिक्षक बांधवांचा सन्मान तसेच वाढदिवसानिमित्त शिक्षक बांधवांचे अभिष्टचिंतन ही करण्यात येते. अटल घन वन वृक्ष लागवड प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य इत्यादी विधायक उपक्रम शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आले आहेत. यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य तथा स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेचे संचालक विनायक चव्हाण, सत्येंदू रापतवार, संदीप दरवेशवार, विष्णू गंगणे, बाळासाहेब माने, शहाजी मगर, समाधान धिवार यांनी पुढाकार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *