पुणे: टिव्ही 9 वृत वाहिनीचे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे.
पांडुरंग रायकर यांची अँटिजन टेस्ट निगेटिव्ह अली होती. त्यानंतर ते विश्रांतीसाठी गावी गेले. पुन्हा थोडी तब्येत बिघडली. तेव्हा swab टेस्ट केली. ती पाॅझिटिव्ह आली. मग कोपरगावच्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे 40 हजार रुपये ऍडव्हान्स भरायला सांगितले. आधीच चणचण असल्याने तिथे ऍडमिट न होता पुण्यात जम्बो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. तेथे दुर्लक्ष झाल्याने प्रकृती खालावत गेली. खासगी हॉस्पिटल्समध्ये व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध नव्हता. अखेर काल संध्याकाळी मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला. तिकडे शिफ्ट करण्यासाठी कार्डियाक अम्ब्युलन्स हवी होती. ती पहाटेपर्यंत मिळू शकली नाही. जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता.