चक्रीय स्थितीमुळे ४ ते ७ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट
पुणे: अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने मान्सून काही भागात सक्रिय झाला आहे. ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
राज्यात मान्सूनचा जोर बहुतांश भागात कमी झालेला असताना अरबी समुद्रात झालेल्या चक्रीय स्थितीमुळे मान्सूनचे वारे पुन्हा काही भागापुरते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिलह्यात चार दिवस मुसळधार पाऊस पडेल. दरम्यान, रायगड, नाशिक, नगर, सोलापूर, बीड, नांदेड या भागातही मध्यम स्वरुाचा पाऊस पडेल तर उर्वरित राज्यात तुरळक पाऊस राहील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. सध्या मान्सूनचा जोर हिमालयापासून मध्यप्रदेश पर्यंत आहे. मध्यप्रदेश झारखंड भागात तो अधिक तीव्र स्वरुपाचा आहे.