# जायकवाडी 97 टक्के भरलं; 27 पैकी 2 दरवाजे अर्धा फूट वर उचलून एक हजार क्युसेस वेगाने विसर्ग.

औरंगाबाद: जायकवाडी धरण तुंडुब भरले असून शनिवारी दुपारी जायकवाडीच्या 27 दरवाज्यांपैकी दोन दरवाजे अर्धा फूट वर उचलून एक हजार क्युसेस या वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा करून श्रीफळ फोडून धरणाचे दरवाजे वर उचलण्यात आले. धरणात पाण्याची आवक वाढल्यास विसर्गात वाढ करण्यात येईल, असे जायकवाडी कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाचे पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाड्यातील शेती सिचंनासाठी सोबतच उद्योगासाठी वरदान असलेले जायकवाडी धरण यंदाही तुंडुब भरले आहे. आज धरणात पाण्याची आवक सुरुच असल्याने जायकवाडी पाटबंधारे विभागाने जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आज दुपारी बारा वाजता धरणाच्या 10 व 27 क्रमांकांचे दोन दरवाजे अर्धा फूट वर उचलून एक हजार क्युसेस पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे. यंदाही धरण तुंडूब भरल्याने मराठवाड्यातील जनतेला दिलासा मिळाला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर शेती सिंचनाला आणि औद्योगिक वसाहतीला वर्षभर पाणी मिळणार आहे.

शनिवार, ५/०९/२०२० जायकवाडी प्रकल्प (नाथसागर) सकाळी ०६:०० वाजताची स्थिती:

१) धरणाची पाणी पातळी:
१५२१.५६ फुटामध्ये
२)धरणाची पाणीपातळी: ४६३.७७२ मीटरमध्ये
३)आवक: ६१८१क्युसेक
४)एकूण पाणीसाठा: २८५६.५०० दलघमी
५)जिवंत पाणी साठा: २११८.३९४ दलघमी
६)धरणाची टक्केवारी: ९७.५७ %
७)उजवा कालवा विसर्ग: ५००क्युसेक
८)पैठण जलविद्युत केंद्र: १५८९ क्युसेक
९)पैठण डावा कालवा: १०० क्युसेक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *