# 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी.

मुंबई: इयत्ता 9 ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा 21 सप्टेंबरपासून सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. स्वेच्छेने व पालकांच्या संमतीने शिक्षकांच्या मार्गदर्शनखाली विद्यार्थी शाळेत येतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाकडून याबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

येत्या 21 सप्टेंबरपासून इयत्ता 9 ते 12 वी वर्गसाठी शाळा सुरू करण्यास केंद्राकडून परवानगी मिळाली असून त्यासाठी काटेकोर पणे गाईडलाईन्सचे पालन करणे सुद्धा गरजेचं आहे. पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी शाळेत येतील. शिवाय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळा सुरू करण्यास परवानगी असेल. एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक आजारी असल्यास त्याने शाळेत येऊ नये. शाळेत एक वेगळा आयसोलेशन रुमही बनवला गेला पाहिजे. जेणेकरुन जर कोणी आजारी असेल तर तो आरोग्य सुविधा येईपर्यंत त्या खोलीत राहू शकेल. जर एखादा विद्यार्थी आजारी पडला तर त्याला पालकांसह स्थानिक आरोग्य यंत्रणेस माहिती द्यावी लागेल. शाळा सुरू करताना विद्यार्थी, शिक्षक हा कोणत्याही लक्षण नसलेला व्यक्तीला शाळेत येण्यास परवानगी असणार आहे. मास्क, सॅनिटायजरचा वापर शाळेत वेळोवेळी खबरदारी म्हणून केला जाणार आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाण्यासाठी 6 फूट अंतर राखावे. यासाठी वर्ग खोलीत सुद्धा त्यानुसार आसनव्यवस्था करण्यात यावी, अशी नियमावली केंद्र सरकारने जारी केली आहे. बाहेरील व्यक्तीस शाळेत येण्यास मनाई असणार आहे. लायब्ररी, मेस, कँटिनमध्ये सुद्धा योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. ट्रान्सपोर्टेशनमध्ये बस, वाहन पूर्णपणे सॅनिटाइज केले जावे, अशा सूचना केंद्राने केल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करण्यास परवानगी नाही. शिवाय कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या शिक्षण, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाऱ्याला शाळेत येण्यास परवानगी नाही. शाळा सुरु करण्याआधी संपूर्ण परिसर, वर्ग, प्रयोगशाळा, टीचिंग परिसर एक टक्के सोडियम हायपोक्लोराइटने सॅनिटाईज करावा लागणार आहे. विशेषत: ज्या पृष्ठभागावर वारंवार स्पर्श केला जातो तो भाग स्वच्छ करावा. शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अंतर 6 फूटांपेक्षा जास्त असावे. ज्या शाळा क्वॉरंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात आल्या त्या पुन्हा सुरू करण्यापूर्वी स्वच्छ आणि डीप सॅनिटाईल केल्या जाणार आहेत. या कालावधीत केवळ 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शाळेत बोलावले जाईल. शाळेत बायोमेट्रिक हजेरीऐवजी शाळा प्रशासनाकडून संपर्क कमी हजेरीसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल. शाळेचा प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी गेट वेगळे असले पाहिजेत. त्याच वेळी शाळेत प्रवेश करताना गेटवर थर्मल स्कॅनिंग आणि हँड सॅनिटायझरची एक प्रणाली असावी. केवळ असे विद्यार्थी आणि शिक्षक ज्यांना कोणत्याही प्रकारचक लक्षणे नाहीत तेच शाळेत जाऊ शकतील. त्याचबरोबर गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. विद्यार्थी पेन्सिल, पेन, पुस्तक, टिफिन आणि पाण्याची बाटली यासारख्या गोष्टी शेअर करणार नाहीत, यावर शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही नेहमी मास्क घालावं लागणार आहे. शाळेतून वाहतुकीची सुविधा असल्यास दररोज वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन रोज सॅनिटाईज केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *