पुणे: आगामी चार दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचे संकेत आहेत. बुधवार, १६ ते १९ सप्टेंबर पर्यंत कोकणातील काही भागासह मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरासह गुजरात किनापट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने कोकणातील काही भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद या शहरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.