# मुंबईत आज रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत आज मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर पर्यंत मुंबईत जमावबंदी लागू राहणार आहे. जमावबंदीच्या काळात ४ पेक्षा जास्त लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

राज्य सरकारने ३१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्तांनी आज संध्याकाळी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मुंबईत दररोज २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे.  बुधवारी २ हजार ३५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पावणे दोन लाखांच्या वर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *