# सारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबादेत १३ ठिकाणी ताप तपासणी केंद्र सुरू.

 

औरंगाबाद : पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या निर्देशानंतर औरंगाबाद महानगरपालिकेने कोरोना, सारी (सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस) तसेच इतर विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. विशेषतः सारीसाठी १३ ठिकाणी ताप तपासणी केंद्र स्थापन केले आहेत.

औरंगाबादमध्ये कोरोना तसेच सारीचा प्रभाव वाढत असून त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना पालमकंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे दिल्या होत्या. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे (कोवीड -१९) कोरोना संशयित व कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एकूण चार गटात याची वर्गवारी करण्यात आली आहे.

शहरात एकूण १३ ठिकाणी ताप तपासणी केंद्र (Covid Fever Clinic ) सुरू करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सौम्य आजार असलेल्या कोरोनासदृश्य रुग्णांची तपासणी करण्यात येईल. गरज भासल्यास अशा रुग्णांना कोविड केअर सेंटर (CCC)येथे भरती केले जाईल.

ताप उपचार केंद्र पुढील प्रमाणे
१.समाजकल्याण हॉस्टेल, किलेआर्क
२.एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स एन -६
३.ईओसी, अग्निशमन दल पदमपुरा
४.एमआयटी इंजिनिअरनिंग कॉलेज हॉस्टेल, बीड बायपास रोड
५.आयएमए मिनी हॉल, शनी मंदिर समर्थनगर
६.आयएमए कम्युनिटी सेंटर एन -२
७.मनपा शाळा, गारखेडा
८.मनपा शाळा, भडकल गेट
९.मनपा शॉपिंग सेंटर, टीव्ही सेंटर चौक
१०.मनपा शाळा कांचनवाडी
११. एमजीएम कॉलेज अँड हॉस्पिटल, एन -६
१२.धूत हॉस्पिटल, जालना रॊड .
13. देवगिरी महाविद्यालयाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह.
वरील १३ ठिकाणी ताप उपचार केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. वरील १३ ताप उपचार केंद्र या ठिकाणी डॉक्टर, नर्स यांच्यासह २५०० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्व ठिकाणी जेवण आणि इतर आवश्यक सुविधा औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

२).मध्यम आजार उपचार केंद्र (DCHC –Dedicated Covid Health Center ) –
१- सिव्हिल हॉस्पिटल (मिनी घाटी ) चिकलठाणा- खाटांची संख्या २२०
३.तीव्र आजार उपचार केंद्र (DCH –Dedicated Covid Hospital ) -१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी ) खाटांची संख्या ४५०
४. तसेच जे हॉस्पिटल कोवीड सुविधेसाठी निश्चित करण्यात आलेले नाहीत अशा सर्व हॉस्पिटल्समध्ये कोवीड -१९ च्या रुग्ण व्यतिरिक्त इतर सर्व आजारांसाठी उपचार करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत.
५ .तसेच कोरोना संशयित रुग्णांसाठी कलाग्राम, चिकलठाणा एमआयडीसी येथे कोरन्टाईन वार्ड तयार करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सर्व अत्यावश्यक सुविधा व मनोरंजनासाठी कॅरम, बुद्धीबळ या सारखे खेळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
६.औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरात ९ झोन मधील एकूण २२ शाळेत स्थलांतरित मजूर , यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

१.मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा एन-७ येथे ५६,
२. मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा एन-६ येथे ५६
३.मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा जवाहर कॉलनी येथे-२७
या तीन ठिकाणी एकूण १३९ स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
७. शहरात सर्व ९ झोनमध्ये जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आलेली आहे.
८. औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विलगीकरण कक्षाकरिता व इतर रोगाच्या कामासंदर्भात ठराविक वेतनावर कंत्राटी पद्धतीवर ३ डॉक्टर नियुक्त करण्यात आलेले आहेत.
९. औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी सामाजिक अंतर ठेवणे साठी व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात सर्व ९ झोन मध्ये एकूण ४० निर्धारित केलेल्या ठिकाणी भाजी मंडई व फळे विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
१०. शहरात सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत मागील दोन दिवसात एकूण १७७ विना मास्क फिरणारे नागरिक यांचेकडून एकूण ८९,५००/- रुपये दंड आकारण्यात आलेला आहे.
११. औरंगाबाद महानगरपालिका व औरंगाबाद फर्स्ट या स्वयंसेवी संस्थे मार्फत नागरिकांना किराणा , भाजीपाला ,फळे व औषधी अशा अत्यावश्यक सामग्रीची ऑनलाईन ऑर्डर घेऊन या तत्वावर घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर घरपोच सेवा ही सशुल्क असणार आहे.www.emergency-needs.com ,व 9654535041 या हेल्पलाईन नंबरवरसंपर्क करून नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
१२.औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे मनपा हद्दीत कोरोना विषाणू संसर्ग झालेले व संशयित सामान्य नागरिकांपासून वेगळे ठेवण्यासाठी शहरात एकूण ५ ठिकाणी अलगीकरण /विलगीकरण अथवा निवारागृह उभारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी मनपातर्फे सर्व अत्यावश्यक सुविधा जसे की विद्युत व्यवस्था, पंखे, सीसीटीव्ही कॅमेरे, सर्व ठिकाणी मनोरंजनाची साधने उदा.कॅरमबोर्ड, बुद्धिबळपट इ. सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.
१३.औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे कोवीड -१९ बाबत नागरिकांचे मदतीसाठी मनपा मुख्यालय येथे २४ तास कोरोना उपाययोजना नियंत्रण कक्ष तयार करण्यात आलेले आहे. यासाठी हेल्पलाइन नंबर 8956306007 या क्रमांकावर नागरिक संपर्क करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *