# शेतकरी विरोधी विधेयकांविरोधात शनिवारी काँग्रेसची ‘स्पीक अप फॉर फार्मर्स‘ ऑनलाईन मोहीम.

अंबाजोगाई: अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘स्पीक अप फॉर फार्मर्स‘ ही ऑनलाईन मोहीम शनिवार, 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतर्गंत बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारने जी विधेयके आणली. ती मागे घ्यावीत अशी मागणी करणारे व्हिडीओ, फोटो, संदेश हे सोशल मिडीयावर म्हणजेच फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम, युट्यूब यावर पोस्ट करायच्या आहेत. या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होवून आपला आवाज बुलंद करू व या संघर्षात शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आवाहन करत या मोहिमेत बीड जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्याक सेल, ओ.बी.सी. सेल, एनएसयुआय, सोशल मिडिया आदी सर्व फ्रंट ऑर्गनायझेशनचे नेते, जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष हे सहभागी होणार आहेत. या मोहिमेतून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयका विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.

नवीन काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त:  राजकिशोर मोदी-  बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे राजकिशोर मोदी यांनी या बाबत बोलताना नमूद केले आहे की, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयका विरूद्ध 24 सप्टेंबरपासून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवार, 26 सप्टेंबर रोजी ‘स्पीक अप फॉर फार्मर्स‘ ही ऑनलाईन मोहीम राबविण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर करून घेतली असून या नवीन काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. या विधेयकांच्या विरोधात लाखो शेतकरी व शेतमजूर रस्त्यांवर येऊन याला तीव्र विरोध करत असताना हे निर्दयी सरकार त्यांचा आवाज बंद करण्यासाठी लाठीमार करत आहे. या सरकारचा पूर्वानुभव पाहता ते संसदेसह कोणाशीही चर्चा वा संवाद न साधताच गरिब शेतक-यांवर हा कायदा लादत आहे हे अन्यायकारक आहे. या पार्श्‍वभूमीवरच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहूल गांधी यांच्या निर्देशानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, प्रभारी यांच्या समवेत एक विशेष बैठक, 21 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत शेतकरी विरोधी विधयके व त्याविरोधात संघर्ष करणा-या शेतक-यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी 24 सप्टेंबर पासून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाचे स्वरुप म्हणजे ऑनलाईन मोहीम होय. भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकांना विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी यात सहभाग नोंदवायचा आहे. तरी या मोहिमेत बीड जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्याक सेल, ओ.बी.सी.सेल, एनएसयुआय, सोशल मिडिया आदी सर्व फ्रंट ऑर्गनायझेशनचे नेते, जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *