पुन्हा एक पणती विजली अन् अंधार झाला..
बदलले काही नाही मेणबत्तीने रस्ता सजला…
फाटले ते वस्त्र फाटल्या त्या पाकळ्या..
नाही उरला अर्थ आता तिच्या शृंगाराला…
जातीवादाने एक जीव गमावला..
अजून काय जातीवाद पाहायचा राहिला…
किती रे काटे टोचावे एका फुलाला..
देवा थांबव सगळं खरंच खूप कंटाळा आला…
अधिक बळ दे नारीशक्तीला..
दे ताकत असुरांच्या वधाला…
-यशश्री शालिनी विलास इंगळे