पुणे: राज्यात शुक्रवारपासून पाऊस सुरू झाला आहे. मध्यमहाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, नगर, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, नंदुरबार आणि कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात हवामान विभागाने दिलेला ‘यलो अर्लट’ कायम आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह आणि सोसाट्याचा वा-यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस अजून दोन दिवस बरसणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मध्यमहाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर 5 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिम भागापासून ओडिशा, उत्तर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्राच्या मध्यपूर्व भागात चक्रीय स्थिती तर दक्षिण छत्तीसगड भागावर चक्रीय स्थिती त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे.