डाॅ.बाआंम विद्यापीठ पदवी पदव्युत्तरच्या परीक्षा ९ ऑक्टोबरपासून; वेळापत्रक घोषित
औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा ९ ऑक्टोबर पासून होणार आहेत. ऑनलाईन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देणे बंधनकारक आहे.
या संदर्भात परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी माहिती दिली. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑक्टोबर २०२० (उन्हाळी २०२० च्या) परीक्षांचे आयोजन ९ ऑक्टोबर पासून करण्यात आलेले आहे. या परीक्षा विद्यापीठामार्फत ऑनलाईन (एमसीक्यू ) पध्दतीने घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने ही देता येणार आहे. दोन्हीपैकी एकच पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे. कुलगुरू डॉप्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा देण्यासाठीची सहमती दर्शविली आहे, अशा विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देणे अनिवार्य आहे. ही सुविधा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर
(https;//bamu.unionline.in) या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
माॅक टेस्ट विद्यार्थ्यांनाना देणे बंधनकारक आहे. जे विद्यार्थी ही मॉक टेस्ट देणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना त्यांनी नमूद केलेल्या मोबाईल/सेंटरला प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार नाही, याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. सर्व प्राचार्यांना विनंती की, आपण देखील ऑनलाईन परीक्षा देणा-या सर्व विद्यार्थ्यांना याबाबत आयटी कॉरीडोअर मार्फत अवगत करुन मार्गदर्शन करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे आवाहन डॉ.योगेश पाटील यांनी केले आहे.