# नांदेड-पनवेल, औरंगाबाद- हैदराबादसह पाच विशेष गाड्या शुक्रवारपासून. 

नांदेड: येणाऱ्या सणासुदीचा विचार करून प्रवाशांच्या सुविधेसाठी दक्षिण मध्य रेल्वे २० ऑक्टोबर पासून तीन फेस्टिव्हल विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. तसेच शुक्रवार, २३ ऑक्टोबर पासून आणखी पाच उत्सव विशेष गाड्या सुरु करण्यात येत आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. या चारही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही.

गाडीच्या वेळा पुढीलप्रमाणे:
क्र. गाडी संख्या कुठून कुठे वेळ दिनांक
1. ०७६१४ नांदेड पनवेल १७.३० वाजता २३.१०.२०२० ते २९.११.२०२०
2. ०७६१३ पनवेल नांदेड १६.०० वाजता २४.१०.२०२० ते
३०.११.२०२०
3. ०७६८८ धर्माबाद मनमाड ०४.०० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२०
4. ०७६८७ मनमाड धर्माबाद १५.०० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२०
5. ०७६३९ दर सोमवारी काचीगुडा अकोला ०७.१० वाजता २६.१०.२०२० ते २३.११.२०२०
6. ०७६४० दर मंगळवारी अकोला काचीगुडा ०९.३० वाजता २७.१०.२०२० ते

२४.११.२०२०

७. ०७६४१
(आठ्वड्यातून सहा दिवस ) काचीगुडा नारख़ेड ०७.१० वाजता २३.१०.२०२० ते २९.११.२०२०
८. ०७६४२ (आठ्वड्यातून सहा दिवस) नारख़ेड काचीगुडा ०४.३० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२०
९. ०७०४९ मार्गे परळी हैदराबाद औरंगाबाद २२.४५ वाजता २३.१०.२०२० ते २९.११.२०२०
१०. ०७०५० मार्गे परळी औरंगाबाद हैदराबाद 16.15 वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२०

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *