नवी दिल्ली: भारताने आणखी महत्वपूर्ण कामगिरीची नोंद केली आहे. बाधित रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आज 90.00% टक्क्यांवर जाऊन पोहोचला. गेल्या 24 तासांत 62,077 रूग्ण बरे होऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे तर नव्या निश्चित रुग्णांची संख्या 50,129 इतकी आहे. ही कामगिरी सक्रीय रुग्णांच्या सातत्याने कमी होणाऱ्या दराशी जुळत असून ती संख्या सतत तिसऱ्या दिवशी सात लाखांपेक्षा कमी आहे.
सध्या सक्रीय रुग्णांचे प्रमाण केवळ 8.50%इतके असून देशातील पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 6,68,154 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 70,78,123 रुग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होत असल्यामुळे हे अंतर सतत रुंदावत आहे. बरे झालेल्या आणि सक्रिय रूग्णांच्या संख्येतील अंतर 64लाख (64,09,969) इतके आहे.
गेल्या आठवड्यापासून दगावलेल्या रुग्णांची संख्या 1,000 पेक्षा कमी नोंदली जात आहे. 2 आॅक्टोबर पासून 11,00 पेक्षा कमी रुग्ण दगावले आहेत. नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 75% टक्के रूग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्रप्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश, आणि चंदिगड या 10राज्य/केंद्रशासित प्रदेशांत एकत्रित झालेले आढळून आले आहेत. महाराष्ट्र यात आघाडीवर असून दररोज 10,000 पेक्षा जास्त रूग्ण बरे होत आहेत.
गेल्या 24 तासांत 50,129 नव्या निश्चित रुग्णांची नोंद झाली. नवे 79% रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशांत आहेत. केरळमधे सर्वात जास्त नव्या रुग्णांची नोंद होत असून 8000 पेक्षा जास्त रुग्ण या राज्यात आहेत, त्या खालोखाल महाराष्ट्रात 6000 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 578 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 80% दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशांत आहेत. सर्वाधिक रूग्ण दगावण्यात महाराष्ट्राचा वाटा असून नवे 137 रूग्ण दगावले आहेत.
भारतातील प्रयोगशाळांच्या जाळ्याने आणखी एक उच्चांक नोंदवला आहे. एकूण प्रयोगशाळांची संख्या 2000 पेक्षा जास्त झाली आहे. पुण्यातील एका प्रयोगशाळेपासून सुरुवात करत आता प्रयोगशाळांची संख्या 2003 झाली असून त्यापैकी 1126 सरकारी तर 877 प्रयोगशाळा खाजगी आहेत.