# जात वैधता प्रमाणपत्रासाठी परिपूर्ण अर्ज समितीकडे सादर करावा.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या लिंक वर भरावा ऑनलाईन अर्ज

पुणे: शैक्षणिक वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत त्यांचे अर्ज वैधता प्रमाणपत्र समितीकडे सादर केलेल नाहीत त्यांनी
https://bartievalidity.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरावा व मूळ कागदपत्रांसह संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीकडे सादर करावे. तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज विहीत वेळेत समितीकडे सादर करावे.

ज्या प्रस्तावामध्ये समितीकडून अर्जदारास त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत त्या त्रुटींची पूर्तता अर्जदाराने संबंधित समितीकडे करावी, याबाबत काही तांत्रिक व इतर अडचणी आल्यास helpdesk@barti.in व टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 18002330444, तसेच 9404999453/9404999452 या हॉटस्ॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तसेच राज्य जात पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *