# डाॅ.बाआंम विद्यापीठ: परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी.

३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी होणार पेपर

औरंगाबाद: पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेपासून कोणत्याही कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. १८ ते २९ ऑक्टोबर या काळात तांत्रिक अडचण आलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेची संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ९ ऑक्टोबर पासून सुरु झाल्या आहेत. येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत दररोज दोन सत्रात या परीक्षा होत आहेत. पहिले सत्र सकाळी ९ ते ३ व दुपारचे सत्र २ ते ८ या दरम्यान होत आहेत. दरम्यान, दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे जे कोणी विद्यार्थी १८ ते २९ ऑक्टोबर या काळात ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देऊ शकले नाहीत. त्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देता येणार आहे. १८ ते २२ ऑक्टोबर या काळातील पेपर ३१ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. तर २३ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत पेपर न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी १ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन आपल्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने द्याव्यात, असे परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *