# विदर्भात तापमान घसरले; चंद्रपूर राज्यात सर्वात कमी ११.६ अंश सेल्सिअस.

पुणे: राज्यात विदर्भात किमान तापमानाचा पारा वेगाने घसरत असून सरासरी तापमान ३ ते ७ अंशानी घसरले आहे. शुक्रवारी राज्यात सर्वात कमी ११.६ अंश सेल्सिअस इतके तापमान विदर्भातील चंद्रपूर शहरात नोंदवले गेले.

1 नोव्हेंबर पासून राज्याच्या किमान तापमानात हळू हळू घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात कोकण वगळता मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात किमान तापमान सरासरी २ ते ३ अंशाने घटले आहे, तर राज्यात विदर्भाचे किमान तापमान ३ ते ७ अंशानी घटले आहे. त्यामुळे त्या भागात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे त्या पाठोपाठ मध्यमहाराष्ट्राचा पारा खाली आला असून सायंकाळी सहानंतर गारवा जाणवत आहे.

प्रमुख शहरांचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये):

विदर्भ: चंद्रपूर (११.६), अकोला (१५), अमरावती (१३.७), बुलढाणा (१६), ब्रम्हपूरी (१४.७), गोंदिया (१२), नागपूर (१३.६), वाशिम (१४), वर्धा (१६).

मध्यमहाराष्ट्र:  पुणे (१३.८), लोहगाव (१५), जळगाव (१७.६), मालेगाव (१६.६), सातारा (१४.९) कोल्हापूर (१५.३).

मराठवाडा:  औरंगाबाद (१५), बीड (१९.४)

कोकण: मुंबई (२४.५), अलिबाग (२१.८), रत्नागिरी (२०.८), डहाणू (२२).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *