मुंबई: “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावं नाकरणार नाहीत,” अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच “अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या स्पष्टवक्ता आहेत, त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल,” असेही राऊतांनी यावेळी सांगितले.
चंद्रकांत पाटील-राज्यपाल भेटीने चर्चेला उधाण:
राज्य सरकारने काल राजभवन येथे जाऊन विधानपरिषदेसाठी 12 जणांच्या नावांची शिफारस दिली. त्यानंतर आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यांची यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळांत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, ही भेट अनौपचारिक होती असं चंद्रकातं पाटील यांनी सांगितलं.