# देशभरातील डिजिटल माध्यमे, ओटीटी यावर माहिती व प्रसारण खात्याचे नियंत्रण.

नवी दिल्ली:  देशभरातील डिजिटल माध्यमे तसेच ओटीटी मंच हे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार आहेत. आज सकाळी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.  या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

देशातील डिजिटल माध्यमांवर आता केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण खात्याचं नियंत्रण असेल. सध्या डिजिटल म्हणजेच ऑनलाईन माध्यमांवर कोणाचंही नियंत्रण नव्हतं. केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेमुळे आता डिजिटल म्हणजेच ऑनलाईन माध्यमं, ऑनलाईन चित्रपट, ऑडिओ व्हिज्यूअल कन्टेन्ट, बातम्या आणि ताज्या घडामोडींविषयीचा कन्टेन्ट माहिती प्रसारण खात्याच्या अंतर्गत दिला गेला आहे. बुधवारी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

देशभरात डिजिटल मीडिया हा मोठ्या प्रमाणात वापरला जात असला तरी यावर नेमके कुणाचे नियंत्रण नसल्याची बाब अनेकदा अधोरेखीत करण्यात आली होती. वृत्तपत्र व अन्य मुद्रीत माध्यमांसाठी आरएनआय नोंदणी अनिवार्य असतांना डिजिटल मीडियासाठी देखील याच प्रकारचे धोरण असावे अशी मागणी  करण्यात येत होती. यासाठी केंद्र सरकारने लोकांकडून सूचना देखील मागविल्या होत्या. या अनुषंगाने आज सकाळी एक नोटिफिकेशन काढण्यात आले आहे.  यात देशभरात ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून स्ट्रीमिंग करण्यात येणारे ऑडिओ व्हिज्युअल कंटेन्ट म्हणजेच ओटीटी सर्व्हीस आणि न्यूज व करंट अफेयर्स या प्रकारातील डिजिटल माध्यमे यांचे नियंत्रण आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय ओटीटी प्लॅटफॉर्म्स व विविध न्यूज पोर्टल्सवरील माहितीचे नियंत्रण कसे करणार? याबाबतची नोंदणी प्रक्रिया कशी असेल याच्या माहितीबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *