नांदेड: प्रवाशांच्या मागणीवरून नांदेड-पनवेल- नांदेड उत्सव विशेष गाडीची मुदत आणखी आठ दिवस वाढविली. नांदेड-पनवेल 23 नोव्हेंबर रोजी व पनवेल-नांदेड गाडी 24 नोव्हेंबर पासून बंद करण्यात येणार होती. मात्र, प्रवाशांच्या मागणीवरून या गाडीची मुदत वाढवण्यात आली आहे.
दक्षिण मध्य रेल्वे ने उत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी उत्सव विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. यापैकी काही उत्सव विशेष गाड्या मध्ये प्रवासी संख्या अत्यंत कमी असल्यामुळे या गाड्या रद्द केल्या आहेत. सध्या सुरु असलेली गाडी संख्या 07613 / 07614 नांदेड-पनवेल- नांदेड या उत्सव विशेष गाडीला प्रवाशांच्या मागणी वरून आणखी 8 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे:
1)गाडी संख्या 07614 नांदेड-पनवेल: या कार्यालयाने पूर्वी घोषित केल्यानुसार ही गाडी 23 नोव्हेंबर पासून रद्द केली होती. परंतु जनतेच्या मागणीवरून या गाडीची मुदत 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर, 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
2)गाडी संख्या 07613 पनवेल ते नांदेड: या कार्यालयाने पूर्वी घोषित केल्यानुसार ही गाडी 24 नोव्हेंबर पासून रद्द केली होती. परंतु जनतेच्या मागणीवरून या गाडीची मुदत 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले आहे.