तामिळनाडू, पुद्दुचेरीला रेड ॲलर्ट; मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र, कोकणात विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस
पुणे: निवार चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात बुधवारी २५ रोजी दुपारी २ वाजता दाखल झाले असून सध्या त्याचा वेग ताशी १२ किमी इतका कमी आहे. मात्र, २५ रोजी रात्री त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्याचा वेग ताशी १२५ ते १४५ किमी पर्यंत झाला आहे. त्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी भागांना हवामान शास्त्र विभागाने रेड ॲलर्ट जारी केला आहे. या वादळामुळे संपर्ण देशात थंडीची लाट येणार असून किमान तापमान ३ ते ५ अंशानी घटणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भात यलो ॲलर्ट देण्यात आला आहे, तर मध्यमहाष्ट्र, मराठवाडा व कोकण भागात बोचऱ्या वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
निवार चक्रीवादळ बुधवारी बंगालच्या उपसागरात दुपारी २ वाजता दाखल झाले सध्या ते पुद्दुचेरी पासून १५० किमी तर चेन्नईपासून २२० किमी अंतरावर आहे. त्याचा वेग ताशी १२ ते १५ किमी आहे. मात्र, नंतर त्याचा वेग ताशी १२० ते १३० किमी इतका वाढून म १४५ किमी पर्यंत जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण भारतात सावधानतेचा इशारा दिला आहे. यात तामिळनाडू, पुद्दुचेरी भागांना रेड अलर्टजारी केला आहे. दरम्यान, २४ नोव्हेंबर पासूनच या भागात पासाचे तुफान तांडव सुरु झाले असून किनारपट्टी भागातील लोकांना हलवण्याचे काम सुरु झाले आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच समुद्र किनाऱ्यावर मच्छीमारांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संपूर्ण भागात बचाव कार्यासाठी जवानांच्या १२०० पेक्षा जास्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
दक्षिण भारतात तांडव, महाराष्ट्रात थंडी: दक्षिण भारतात कच्ची घरे पडण्याचा, वीज तारा तुटणे, वाऱ्याने पत्रे उडू शकतात रस्तावर झाडे उन्मळून पडू शकतात, असा इशारा दिल्याने तामिळनाडू, पुद्दुचेरी या भागातील लोकांनी २६ रोजी घराबाहेर पडू नये असा इशारा सरकारने दिला आहे. महाराष्ट्रात मात्र या वादळाचा फारसा धोका नसला तरीही विदर्भात काही भागात २५ ते ५० मिमी इतका पाऊस पडेल. तसेच मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र, कोकण भागात बोचरे वारे वाहुन मध्यम पाऊस पडेल त्यामुळे किमान तापमानात मोठी घट होऊन २६ ते २९ पर्यंत थंडीची लाट राहिल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भात यलो ॲलर्ट, उर्वरीत भागात मध्यम पाऊस: महाराष्ट्रात या वादळामुळे विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या भागांना यलो ॲलर्ट जारी करण्यात आला आहे तर मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती या भागात मध्यम पाऊस पडेल तर मध्यमहाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर या भागात २६ व २७ रोजी थंड वाऱ्यासह हलका पाऊस पडू शकतो. तसेच तापमानात ३ ते ५ अंशानी घट होईल.