नांदेड: सचखंड विशेष गाडीच्या वेळेत आणि मार्गात नवीन वर्षापासून बदल करण्यात आला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली.
गाडी संख्या 02715/02716 हुजूर साहिब नांदेड –अमृतसर –हुजूर साहिब नांदेड सचखंड विशेष गाडी च्या मार्गात बदल करण्याचे तसेच ही गाडी नवीन वेळेनुसार चालविण्याचे ठरविले आहे. ही विशेष गाडी नवीन वर्षापासून अंबाला, चंदिगढ आणि सानवाल मार्गे धावेल. पूर्वी ही गाडी अंबाला, सरहिंद, सानवाल या मार्गाने धावत होती. या गाडीचा राजपुरा, सरहिंद आणि खन्ना येथील थांबा रद्द करण्यात आला आहे. तसेच या गाडीस चंदिगढ येथे थांबा देण्यात आला आहे.
बदल पुढीलप्रमाणे:
1)गाडी संख्या 02715 – हुजूर साहिब नांदेड – अमृतसर सचखंड विशेष गाडी: 1 जानेवारी, 2021 ला हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी 09.30 वाजता सुटणारी गाडी नवीन वेळापत्रकानुसार बदलेल्या मार्गाने चंदिगढ मार्गे धावेल.
2)गाडी संख्या 02716 अमृतसर-हुजूर साहिब नांदेड सचखंड विशेष गाडी: 3 जानेवारी 2021 ला अमृतसर रेल्वे स्थानकावरून पहाटे 04.25 वाजता सुटणारी गाडी नवीन वेळापत्रकानुसार बदलेल्या मार्गाने चंदिगढ मार्गे धावेल.
दिनांक 1 जानेवारी 2021 पासून प्रवास करतांना प्रवाशांनी या गाडीचा बदललेला मार्ग आणि वेळा लक्षात घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले.