औरंगाबाद: जिल्हा प्रशासनाने Covid-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विदेशातून आलेल्या प्रवाशांमुळे (Foreign Passengers) Covid-19 चा प्रसार होऊ नये यादृष्टीने मानक कार्यपध्दती (SOP) तयार केली आहे. या कार्यपद्धतीची संबंधितांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी नसता साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये विदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी विशेषत: ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांसाठी मानक कार्यपध्दती (SOP) सर्वानुमते ठरविण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.शेळके आदी उपस्थित होते.
विदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी विशेषत: ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांसाठी ठरविण्यात आलेली मानक कार्यपध्दती (SOP) खालीलप्रमाणे:
1)परदेशातून आलेले प्रवासी विशेषत: ब्रिटनमधून आलेले प्रवासी यांची Official यादी भारतीय विमान प्राधिकरण यांनी जिल्हाधिकारी / प्रशासक तथा आयुक्त महापालिका यांचेकडे सादर करावी.
2)हे सर्व परदेशातून आलेले प्रवासी औरंगाबाद विमानतळावरुन महापालिका तर्फे देण्यात आलेल्या बसमधून थेट संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल होतील. यामध्ये सशुल्क आरोग्यसेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना The One Hotel, वसंतराव नाईक महाविद्यालय जवळ, जालना रोड, औरंगाबाद येथे तर नि:शुल्क आरोग्यसेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विश्रामगृह (MCED Guest House) रेल्वे स्टेशन जवळ येथे दाखल करण्यात येईल. सशुल्क आरोग्य सेवा ऐच्छिक राहिल.
3)सदर प्रवाशाने भारतात आगमन केल्याचा दिवस हा प्रथम दिवस (First Day) ग्राह्य मानण्यात येईल. त्यानुसार पुढे 5 – 7 व्या दिवशी सदर प्रवाशाची RT-PCR तपासणी केल्यानंतर, 7 व्या दिवशी तपासणीचा अहवाल आल्यानंतर सदर प्रवाशी नियमानुसार स्थलांतरीत केला जाईल.
4)RT-PCR तपासणीचा नमुना केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथेच पाठविण्यात येईल तोच अहवाल ग्राह्य (Valid) समजण्यात येईल. Positive आलेल्या रुग्णांचे नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद यांचे मार्फत National Institute of Virology (NIV) पुणे येथे Whole Genome Sequencing (WGS) साठी पाठविले जातील.
5)RT-PCR चाचणी अहवाल Negative आल्यास त्यास घरी जाऊ दिले जाईल व त्या प्रवाशांचा भारतात आल्यापासून पुढील 28 दिवस पाठपुरावा (Observation) करण्यात येईल.
6)ज्या प्रवाशांचे RT-PCR अहवाल Positive आले, अशा रुग्णांना स्वतंत्र अलगीकरण कक्षामध्ये (Isolation Ward) भरती करण्यात यावे. त्याकरीता धूत रुग्णालय (Paid Facility) अथवा जिल्हा सामान्य रुग्णालय (Non-Paid Facility) येथे रुग्णाच्या इच्छेप्रमाणे स्थलांतरीत केले जाईल.
7)रुग्णाची उपचारपध्दती नेहमीच्या Covid-19 उपचार प्रणालीप्रमाणे राहिल.
8)Positive रुग्णांचे Whole Genome Squencging चा अहवाल येईपर्यंत Discharge करण्यात येऊ नये. ज्या Positive रुग्णांच्या Genome Squencing मध्ये नवीन विषाणू प्रकार आढळेल, अशा रुग्णांना Discharge देताना 14 व्या दिवशी पुन्हा RT-PCR चाचणी करण्यात यावी. RT-PCR चाचणी Positive आल्यास, जोपर्यंत रुग्णांचे 24 तासांच्या अंतराने दोन नमुने Negative येत नाही तोपर्यंत Discharge देण्यात येऊ नये. Discharge दिलेल्या रुग्णांचा 28 दिवसांपर्यंत बारकाईने पाठपुरावा (Observation) केला जाईल.
9)Positive रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येऊन, त्या सर्वांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात (Institutional Quarantine) ठेवण्यात येईल. सर्व निकट सहवासितांना Positive रुग्णाच्या संपर्कात आल्यापासून, 5 ते 10 दिवसांदरम्यान RT-PCR चाचणी करण्यात येईल आणि प्राप्त अहवालानुसार नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
10) Positive रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची, संपर्कात आल्यापासून 5 ते 10 व्या दिवशी RT-PCR तपासणी करणे आवश्यक राहिल.