पुणे: काल दिलेल्या पश्चिमी विक्षोभ व कमी दाबाच्या क्षेत्रांबरोबर आज एक नवीन कमी दाबाची द्रोणीय स्थिती महाराष्ट्र राज्यावर तयार झालेली आहे. हा कमी दाबाचा पट्टा पूर्व-मध्य अरबी समुद्र, दक्षिण कोकण-गोवा ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. त्यामुळे राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती रहाण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे येथील हवामान विभागाने व्यक्त केली आहे
दक्षिण व मध्य महाराष्ट्रामध्ये आकाश मुख्यत: ढगाळ रहाण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात आकाश अंशत: ढगाळ रहाण्याची शक्यता आहे. पुढिल तीन-चार दिवस राज्यात रात्रीच्या थंडीचा कडाका कमी राहील. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ७ तारखेला थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा व शहरात पुढील ४ दिवस आकाश मुख्यत: ढगाळ रहाण्याची शक्यता आहे. ५, ६ व ७ तारखेला अतिशय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ८ तारखेला थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे.