# राज्यातील अनेक भागात आणखी तीन दिवस पावसाचे.

पुण्यात शुक्रवारी ७२ वर्षातला सर्वात मोठा ३२ मिमी पाऊस

पुणे: मध्य महाराष्ट्र ते कर्नाटक या भागावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील अकरा जिल्ह्यात मोठा पाऊस सुरु आहे तर उर्वरित भागात तुरळक पाऊस सुरु आहे. पावसाने थंडी पळवली असून हा पाऊस ११ जानेवारी पर्यंत राहिल असा अंदाज पुणे येथील हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, शुक्रवारी पुणे शहरात जानेवारी महिन्यातला रेकाॅर्ड ब्रेक ७२ वर्षांतील सर्वात मोठा ३२. मिमी पाऊस झाला आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाल्याने किमान तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. सरासरी किमान तापमान १६ ते १८ अंशावर आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील सर्व भागात पाऊस सुरु आहे. हा पाऊस ११ जानेवारी पर्यंत राहिल. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  शनिवार पासून विदर्भ, मराठवाडा भागातला पाऊस कमी झाला आहे. मात्र, कोकण व मध्य महाराष्ट्रात रविवारी जोरदार पावसाचे संकेत दिले आहेत.

या जिल्ह्यांत यलो अलर्ट; शनिवारी मोठ्या पावसाची शक्यता:
कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, धुळे, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद या १३ जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ९ जानेवारी रोजी या भागात मोठा पाऊस होईल, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *