# पुण्यातील सीरम इन्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू.

चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

पुणे: पुण्यातील सीरम इन्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आग पूर्णपणे विझल्यानंतर वरच्या मजल्यावर पाच जणांचे मृतदेह आढळले. हे सर्वजण बांधकाम मजूर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आज दुपारी भीषण आग लागली होती. कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या संपूर्ण देशासह जगाचं लक्ष पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलं असतानाच ही आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर लागलेली ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जवळपास चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी घटनास्थळास भेट देणार:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी बोलले असून उद्या शुक्रवार, 22 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता पुणे येथे सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील परस्थितीवर लक्ष ठेवून होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *