नांदेड: नांदेड-जम्मू तावी-नांदेड विशेष एक्स्प्रेस 29 जानेवारी पासून सुरू करण्यात येणार आहे. गाडी संख्या 02751/ 02752 नांदेड-जम्मू तावी-नांदेड विशेष एक्स्प्रेस सुरु करण्याचे रेल्वे बोर्डाने मान्य केले आहे. ही गाडी 29 जानेवारी पासून प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध असेल.
१)गाडी संख्या 02751 हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी विशेष एक्स्प्रेस (साप्ताहिक): गाडी संख्या 02751 हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी विशेष एक्स्प्रेस 29 जानेवारी पासून दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी हुजूर साहिब नांदेड येथून दर शुक्रवारी सकाळी 11.05 वाजता सुटेल आणि पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, न्यू दिल्ली, जालंधर मार्गे जम्मू तावी येथे दुसऱ्या दिवशी रात्री 11.05 ला पोहोचेल.
२)गाडी संख्या 02752 जम्मू तावी– हुजूर साहिब नांदेड विशेष एक्स्प्रेस (साप्ताहिक): गाडी संख्या 02752 जम्मू तावी-हुजूर साहिब नांदेड विशेष एक्स्प्रेस 31 जानेवारी, 2021 पासून दर रविवारी धावणार आहे. ही गाडी जम्मू तावी येथून दर रविवारी सकाळी 05.45 वाजता सुटेल आणि जालंधर, अंबाला, न्यू दिल्ली, अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 03.50 वाजता पोहोचेल. ही गाडी पूर्ण आरक्षित असेल, या गाडीत १९ डब्बे असतील. हे सर्व डब्बे वातानुकुलीत आहेत.