# राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु.

मुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरु केली जाणार आहेत, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरु करावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. मात्र, याबाबत काही बैठका देखील पार पडल्या. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिली आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहेत, असे उदय सामंत म्हणाले.

सध्या 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू केले जातील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन देण्याची सूटही देण्यात आली आहे. शाळेत किंवा महाविद्यालयात 75 टक्के उपस्थिती अनिर्वाय असणे गरजेचे असते. मात्र, यंदा कोरोनामुळे ही अट शिथील करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागणीनंतर यूजीसीच्या गाईडलाईन्सनुसार येत्या 15 फेब्रुवारीपासून 50 टक्के उपस्थितीमध्ये आम्ही कॉलेज सुरू करत आहोत. महाविद्यालये उशिरा सुरू होणार असल्याने त्याचे परिणाम निकालावर थोड्या प्रमाणात होतील, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जे महाविद्यालयात येऊ शकत नाहीत त्यांना ऑनलाइन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *