पुणे: राज्यात आज सर्वात कमी तापमान नाशिक येथे 10.00 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. त्याखालोखाल जळगाव 10.4 व पुणे 10. 8, गोंदीया 10.2 एवढे तापमान नोंदवले गेले. मराठवाड्यातील औरंगाबादचे तापमान 12.5 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले.
दरम्यान, पुणे आणि आसपाच्या परिसरात आकाश मुख्यत: निरर्भ राहण्याची शक्यता आहे.दि, 8 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ होण्याचा अंदाज पुणे येथील वेधशाळेने वर्तवला आहे.
गेल्या 24 तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण गोव्याच्या अनेक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झाली आहे. विदर्भाच्या तुरळक भागात तापमानात सरासरीच्या तुनेत लक्षणीय घट तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किंचीत घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे:
मुंबई (कुलाबा) 22.2, सांताक्रुझ 22.0. रत्नागिरी 20.8, पणजी (गोवा) 20.7, डहाणू 17.2, पुणे 10.8, जळगाव 10.4, कोल्हापूर 18.0, महाबळेश्वर 13.6, मालेगाव 11.2, नाशिक 10.0, सांगली 16.3, सातारा 14.9, सोलापूर 16.2, औरंगाबाद 12.5, परभणी 12.4, नांदेड 16.0, अकोला 11.3, अमरावाती 13.4, बुलढाणा 14.0, ब्रम्हपुरी 12.7, चंद्रपूर 12.8, गोंदीया 10.2, नागपूर 14.1, वाशिम 16.0, वर्धा 13.2.