मेंदूतील क्रिया ह्या प्रिंट व इलेक्ट्राॅनिक माध्यमात काम करणार्या लोकांमध्ये सतत सुरू असल्याने मेंदू हा सतत जागृत अवस्थेत राहतो व सतत माहिती च्या सानिध्यात राहिल्याने information overload हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. बहुतेक माध्यम-कर्मीना नोकरीत विमा, भविष्य निधी, नोकरीतील असुरक्षितता यामुळे ताण वाढतो. त्यातही गेल्या वर्षभरात मीडिया क्षेत्रातील ६ लाख च्या आसपास लोकांनी नोकर्या गमावल्या आहेत व अजूनही गळती सुरूच आहे. सहा लाख लोकांची कुटुंबं धरलीत तर जवळपास 24 लाख लोकांच्या आयुष्याला धक्का लागला आहे. या आघातामुळे निर्माण होणारा ताण व नंतर अनेक वर्षे त्याचे जाणवत राहणारे वाईट परिणाम ह्याला Post-Traumatic Stress Disorder/ PTSD म्हणतात. आघातामुळे व नंतर जाणवणारा ताण वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतो.. यावर सविस्तर विवेचन केले आहे औद्योगिक मानसशास्त्राच्या अभ्यासक प्रा.डाॅ.वृषाली राऊत यांनी…
जानेवारी 2020 मध्ये बीबीसी अफ्रिका चे संपादक फेरगेल केयाने (Fergal Keane) ह्यांनी स्वेछा-निवृत्ती जाहीर केली कारण बरेच वर्ष संघर्ष असलेल्या आफ्रिकेतील काही भागात काम करून त्यांना (post-traumatic stress disorder PTSD) चा त्रास जाणवायला लागला. मीडिया क्षेत्रात PTSD हा मानसिक आजार खूप प्रमाणात आढळतो कारण सतत तणावपूर्ण बातम्या, माहिती व घटना ह्यांच्यामुळे मेंदू ताण अनुभवतो. अशा प्रकारच्या कामामुळे होणार्या मानसिक त्रासाला “कामामुळे होणारे मानसिक आजार” म्हणजेच (Emotional occupational hazards) म्हणतात.
आपण जे काही काम करतो त्याचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. शरीराची व मनाची झीज होते (wear & tear of body as well mind) व ह्याला (occupational hazards) म्हणजेच कामामुळे जाणवणारे आरोग्याचे धोके असं नाव आहे. (International Labor organization) ह्या कामगार व कर्मचारी ह्यांच्यासाठी काम करणार्या संघटनेने एखाद्या कामामुळे होणारे आरोग्याचे धोके जाणून घेण्यासाठी एक तक्ता ज्याला (Job Safety Analysis) म्हणतात सुचविला आहे. मात्र, भारतात काही क्षेत्रं सोडली तर बहुतेक क्षेत्रात हा तक्ता वापरत नाहीत व ह्या तक्त्यांनुसार फक्त शारीरिक धोके हे तपासले जातात. मात्र, मानसिक धोके जे तितकेच किंबहुना जास्त जीवघेणी आहेत ती कुठेही लिहिली किंवा शोधली जात नाहीत.
या तक्त्यात जर मानसिक धोके लिहायला गेलात तर त्यात ताण, (information overload) औदासीन्य, चिंता, व तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी केलेली व मग व्यसनात रूपांतर झालेल्या सवयी सुद्धा येतात.
पत्रकारिता हा व्यवसाय लोकांशी संबंधित असल्याने भावनिक चढउतार हे अति-प्रमाणात असून ते कसे हाताळायचे ह्याचं प्रशिक्षण कोणालाही नाही. इलेक्ट्राॅनिक मीडियात आणखी मानसिक धोके असून ते बघणार्या लोकांसाठी सुद्धा तेवढेच घातक आहेत. हे धोके समजावून घेण्याचा थोडक्यात प्रयज्ञ करू.
मेंदूतील भावनिक केंद्र ज्याला (amygdala) म्हणतात ते आपल्या मानवी उत्क्रांतीची देणगी आहे, (amygdala) हे भीतीवर काम करते व (cortex) हा मेंदूतील भाग तर्कशुद्ध विचार करतो. (Amygdala) ला भीती जाणवली (मानसिक किंवा शारीरिक) तर तो शरीरा ला संदेश देतो की आता स्वत: च रक्षण करायला हवं, मग त्यानुसार मानवी शरीर एक तर त्या भीती वाटणाऱ्यापासून दूर जातं किंवा भीती वाटणाऱ्या शी दोन हात करायला सज्ज होतं, ह्याला flight/fight अस नाव आहे. शरीर ह्या भय अवस्थेत ताण अनुभवत असत. इंटरनेट वर आपल्यावर आदळणाऱ्या असंख्य गोष्टी मनात भीतीची भावना सतत जागृत ठेवतात. तार्किक विचार करायला मेंदूला वेळच मिळत नाही, कारण 24*7 वेगवेगळी मध्यम व त्यातून येणारी अखंड माहिती मेंदूत ट्रॅफिक जॅम करते. त्यामुळे आपलं शरीर व मेंदू सतत (alert mode) मध्ये राहून झोप कमी होते, (blue light) ने पण झोपेवर वाईट परिणाम होतो ज्यामुळे शरीरातील सगळ्या क्रिया बिघडतात व लठ्ठपणा वाढतो. अति प्रमाणात इंटरनेट वापरल्याने आपला (stress response activate) होऊन (fight/flight/freeze) cortisol हे stress हॉर्मोन्स ची पातळी वाढून (blood pressure) लागू शकतं.
मानवी मेंदू ची माहिती ग्रहण करण्याची शक्ती मर्यादित आहे उदा. 1950 मध्ये असलेली मानवी मेंदूची ग्रहणशक्ती व 2020 असलेली मानवी मेंदूची ग्रहणशक्ती ही सारखीच असली पण मेंदूत येणारी माहिती ही शेकडो पटीने वाढली आहे. गेल्या 15 वर्षात अगदी सगळ्या वयोगटातील लोकांचे माहिती ग्रहण हे “भूतो न भविष्यती” वाढले आहे. आपला मेंदू माहिती ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करून त्याचा भविष्यात उपयोग व्हावा यासाठी रोज काम करत हिप्पोकॅम्पस नावाच मेंदूतील केंद्रात ही सगळी येणारी माहिती गोळा होत असते, ती माहिती पुढे जाण्यासाठी रात्रीची झोप (deep NERM sleep stage) ही अत्यंत महत्त्वाची ठरते. हिप्पोकॅम्पस मध्ये जमा झालेली माहिती ही पुढे prefrontal cortex/long term memory मध्ये योग्य प्रक्रियेनंतर जमा होऊन निर्णय घेण्याच्या कामी येते. उदा. सायकल चालवायला शिकणे, एखादं वाद्य वाजवायला शिकणे इ. मात्र पूर्वी गोष्टी मर्यादित असल्याने मेंदूवर ताण कमी असायचा मात्र नको असलेली माहिती कान व डोळे यांना सतत कामावर लावून आपल्या मेंदूत घुसखोरी करण्यासाठी धडपडत आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण बकाबक माहिती मेंदूत कोंबण्याचा प्रयत्न करतो पण जसे 1 किलो ची मर्यादा असलेल्या पिशवीत 2 किलो सामान भरू शकत नाही तसे मेंदूत त्याच्या मर्यादेच्या वर माहिती जाऊ शकत नाही व ती टाकताना आपण मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. Information overload चा सगळ्यात मोठा वाईट परिणाम स्मरणशक्ती वर होतो, त्याच प्रमाणे आकलनशक्ती कमी होते व मेंदूची कार्यक्षमता घटते. विसरणे, गोंधळणे, चिडचिड वाढणे, सहनशीलता कमी होणे, एकाग्रता घटणे व focus जाणे हे आता सगळी कडे दिसून येत आहे.
मेंदूतील क्रिया ह्या प्रिंट व इलेक्ट्राॅनिक माध्यमात काम करणार्या लोकांमध्ये सतत सुरू असल्याने मेंदू हा सतत जागृत अवस्थेत राहतो व सतत माहिती च्या सानिध्यात राहिल्याने information overload हा आजार खूप आढळून येतो. कामाचे तास निश्चित नसणे, कामातील क्लिष्टता, द्वेष व दुजाभाव, ऑफिसातील राजकारण, जीवघेणी स्पर्धा, वाढलेलं यांत्रिकीकरण, नको असून वाढलेल्या गरजा, दिखाऊपणा, नात्यातील असुरक्षितता ह्यामुळे ताण गेल्या 15 वर्षात खूपच वाढले आहेत. सतत एकाच ठिकाणी मान खाली घालून, बोट व मनगटाच्या अति हालचाली, चुकीची बसण्याची पद्धत यामुळे शारीरिक त्रास जसे carpal tunnel syndrome, body posture issues, headache, muscle problems व डोळ्यासमोर blue light यामुळे dry eyes, झोपेच्या समस्या होतात सुद्धा माध्यम-कर्मी लोकांमध्ये आढळून येतात.
सतत च्या मशीन संपर्कामुळे संयम कमी होत जातो, संवेदना बोथट होतात, दुसर्याचं ऐकण्याची क्षमता कमी होते व मग लोक हाताळायला कठीण जात. मशीन वर काम करणार्यांचा emotional intelligence/भावनिक बुध्यांक कमी होतो कारण प्रत्यक्ष संवाद साधताना चेहर्यावर चे हाव भाव, अशाब्दीक शारीरिक हालचाली व आवाज या सगळ्यांचा वापर करावा लागतो, तशी आपली शरीर रचना आहे पण आपली ही क्षमता मशीन वर खासकरुन मोबाइल, कॉम्प्युटर व लॅपटॉप वर हळूहळू लुप्त पावते. त्यामुळेच अशी मंडळी एकलकोंडी व चिडचीडी होत जातात.
हे बघा:
https://www.independent.co.uk/life-style/gadgets-and-tech/excessive-internet-use-could-be-raising-your-blood-pressure-us-study-finds-a6685161.html
Grey matter हा मेंदूतील भाग जसा कोकेन मुळे कमी होतो तसाच तो social media च्या वापराने पण कमी होतो. Grey matter हे स्नायूचं नियंत्रण, ज्ञानेंद्रिय जसे संवेदनेचे आकलन, बघणे, ऐकणे, स्मरण, भावना, वाचा, निर्णय क्षमता व स्व नियंत्रण करत व एकदा झालेले grey matter च नुकसान भरून येत नाही. माध्यम कर्मी ना सध्या सोशल मीडिया वर trolling चा सामना करावा लागतो त्यामुळे सुद्धा मानसिक ताण येतो.
हे वाचा:
https://www.psychologytoday.com/us/blog/is-your-brain-technology/201805/does-online-social-networking-change-your-brain
वरील मानसिक परिणाम हे फक्त माध्यम-कर्मी लोकांसाठी लिहिले असून ज्यात काम करताना ह्या लोकांना कोणत्या प्रकारचे व किती त्रास असू शकतील ह्याचा अंदाज येतो. याच बरोबर बहुतेक माध्यम-कर्मीना नोकरीत विमा, भविष्य निधी, नोकरीतील असुरक्षितता व करियर चा मार्ग कसा निवडावा हे न कळल्याने ताण आणखी वाढतो. त्यातही गेल्या वर्षात मिडिया क्षेत्रातील सगळ्यात जास्त प्रमाणात नोकर्या गेल्यात ज्यात मुंबई मिरर, हिंदुस्तान टाइम्स, Huffington post India अश्या अनेक प्रिंट व इलेक्ट्राॅनिक मीडिया कंपन्यांनी लोकांना अचानक काढून टाकले व कुठलीही मानसिक तयारी नसताना ह्या लोकांवर झालेला हा मानसिक आघात अनेकांच आयुष्य उद्ध्वस्त करून गेला. आघातामुळे निर्माण होणारा ताण व नंतर अनेक वर्षे त्याचा जाणवत राहणारे वाईट परिणाम ह्याला Post-Traumatic Stress Disorder/ PTSD म्हणतात. आघातामुळे व नंतर जाणवणारा ताण वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतो.
PTSD ची तीव्रता ही कमी-जास्त असते व जास्त करून पोलीस, संरक्षण दल, डॉक्टर्स, नर्सेस, 24*7 मीडिया, सोशल मीडिया शी संबंधित काम करणारे व ज्यांचा हिंसा/गुन्हे अशा गोष्टींशी संबंध येतो त्या सगळ्यांना हा आजार होतो. माध्यम कर्मीनी केलेली मारहाण, आरडा-ओरड हा त्यांना आलेला ताणाच नकळत केलेलं प्रकटीकरण आहे.
ह्या मानसिक आजारात खालील लक्षणे कमी जास्त प्रमाणात असू शकतात:
-परत परत त्याच आघाती घटनेची आठवण, विचार, किंवा भयानक स्वप्न येणे
-झोप न लागणे
-सतत भय व चिंता घेऊन वावरणे की परत तेच होईल
-आघाताशी संबंधित गोष्टी जाणूनबुजून टाळणे
-depression, anxiety व acute stress diorder हे PTSD च्या रुग्णात आढळतात.
-कामात/अभ्यासात एकाग्र न होणे
-चिडचिड, राग अनावर होणे, नात्यातला तुटकपणा/ कोरडेपणा
-रडणे, अति हळवेपणा
-काही गोष्टींचा फोबिया विकसित होणे
हे बघा:
https://youtu.be/b_n9qegR7C4
माध्यम कर्मी च्या कामगार संघटना, मनुष्यबळ विकास विभाग ह्यांनी ह्या गोष्टीकडे तत्काळ लक्ष द्यायला हवे कारण गेल्या वर्षभरात माध्यमातील ६ लाख च्या आसपास लोकांनी नोकर्या गमावल्या आहेत व अजूनही गळती सुरूच आहे. ६ लाख लोकांची कुटुंब धरलीत तर जवळपास 24 लाख लोकांच्या आयुष्याला धक्का लागला आहे. काही लोकांना शारीरिक श्रमाची काम उदरनिर्वाहासाठी करावी लागत आहे. जी लोक काम करत आहेत त्यांचे पगार निम्मे करण्यात आले असून कामाचे तास मात्र वाढविण्यात आले आहेत.
नोकर कपातीला बर्याच गोष्टी कारणीभूत आहेत ज्यात सरकारी धोरण, माध्यम जगतात शिरलेली कॉर्पोरेट संस्कृती, बदललेला व्यवसाय, सध्याचे राजकीय वातावरण व एकीचा अभाव ह्या गोष्टी सुद्धा आहेत.
हे वाचा:
https://economictimes.indiatimes.com/jobs/the-scary-numbers-a-jobs-crisis-like-no-other/crisis-like-no-other/slideshow/75886914.cms
इतर क्षेत्राप्रमाणे ह्या क्षेत्रात सुद्धा करियर मार्गदर्शन, समुपदेशन गरजेचे ठरते कारण ते नसल्याने ४० च्या घरात पोहचलेल्या अनेकांना/नेकींना पुढे नेमकं काय कराव, उदरनिर्वाह कसा चालवावा ह्याचा गंभीर प्रश्न येतो तसेच तब्येतीच्या तक्रारींमुळे ४० च्या नंतर नवीन शिकण्याची क्षमता कमी होतो व नवीन आलेल्या आव्हानांना तोंड देणे जड जाते. भावनिक मूल्य व नैतिक जबाबदारी ह्याची शिकवण मिळालेल्या माध्यम-कर्मिना केवळ नफा तत्वावर चालणार्या सध्याच्या मीडिया व्यवसायात कमालीच्या दडपणात काम करावे लागते, पटत नसताना सांगीतलं तसं लिहावं लागत चॅनल साठी अनेक वेळा चुकीच्या बातम्या देखील द्यावा लागतात. हे असं करताना किती लोक समाधानाची झोप घेत असतील?
मानसिक ताण हा बौद्धिक क्षमतेवर खूप परिणाम करतो. ताणा खाली काम करणारा कर्मचारी हा अधिक चुका करतो, त्याची कामाची गुणवत्ता खालावते, प्रेरणा कमी होते, कामाशी बांधिलकी कमी होते व ह्या सगळ्यांचा फटका मालकाच्या नफ्यावर होतो.
WHO च्या अनुसार 1 डॉलर जर कामगार/कर्मचार्यांच्या मानसिक आरोग्यावर खर्च केला तर त्यातून ४ डॉलर चा परतावा मिळतो.
माध्यमकर्मीसाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण आहे. कर्मचारी संघटना व मनुष्यबळ विकास ह्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. जी लोकं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासाठी काम करतात, स्वत: त्रास होऊन ही समाजाला उपयोगी काम करतात त्या लोकांना समजून घेऊन त्यांच्या आयुष्याची तजवीज करण ही समाजाची सुद्धा जबाबदारी आहे.
-प्रा.डॉ.वृषाली रामदास राऊत
सहा. प्रा. औद्योगिक मानसशास्त्र,
विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
मोबाईल: 9921369165