नांदेड: प्रवाशांच्या सुविधे करिता दक्षिण मध्य रेल्वे आणखी दोन विशेष रेल्वे सुरू करत आहे. या दोन्ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही.
गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे:
क्र.गाडी संख्या कुठून कुठे दिनांक
1.09301 डॉक्टर आंबेडकर नगर ते यशवंतपूर साप्ताहिक रेल्वे दर रविवारी:
मार्गे इंदोर, उज्जैन, भोपाल, अकोला, वाशीम, पूर्णा, नांदेड, काचीगुडा, धर्मावरम
डॉक्टर आंबेडकर नगर येथून रात्री 08.00 वाजता सुटेल. यशवंतपूर येथे 10.50 वाजता पोहोचेल
28 फेब्रुवारी पासून पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत.
2.09302 यशवंतपूर ते डॉक्टर आंबेडकर नगर साप्ताहिक रेल्वे दर मंगळवारी:
मार्गे धर्मावरम, काचीगुडा, नांदेड, पूर्णा, वाशीम, अकोला, भोपाल, उज्जैन, इंदोर
यशवंतपूर येथून दुपारी 03.50 वाजता सुटेल.
डॉक्टर आंबेडकर नगर येथे रात्री 07.15 वाजता पोहोचेल. 02 मार्च पासून पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत.
3.07207 विजयवाडा ते शिर्डी साप्ताहिक रेल्वे दर मंगळवारी:
सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, औरंगाबाद, मनमाड विजयवाडा येथून सकाळी 10.15 वाजता सुटेल.श्री साई नगर शिर्डी येथे रात्री 07.10 वाजता पोहोचेल. 07 एप्रिल पासून पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत.
4.07208 साई नगर शिर्डी ते विजयवाडा साप्ताहिक रेल्वे दर बुधवारी:
मार्गे मनमाड, औरंगाबाद, परभणी, परळी, विकाराबाद, सिकंदराबाद, काझीपेट.
साई नगर शिर्डी येथून सायंकाळी 05.20 वाजता सुटेल. विजयवाडा येथे दुपारी 03.15 वाजता पोहोचेल. 7 एप्रिल पासून पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत.
प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.