नांदेड: रेल्वे बोर्डाने घोषित केल्यानुसार दोन नवीन रेल्वे गाड्या सुरु होणार आहेत, कोल्हापूर –नागपूर-कोल्हापूर आणि तिरुपती-श्री साईनगर शिर्डी-तिरुपती या गाड्या नांदेड रेल्वे विभागातून धावणार आहेत.
या गाड्या पुढील प्रमाणे:
1)गाडी संख्या 07417 तिरुपती-श्री साई नगर शिर्डी (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी: ही गाडी दिनांक 6 एप्रिल पासून तिरुपती येथून दर मंगळवारी सकाळी 08.30 वाजता सुटेल आणि गुंटकळ, सिकंदराबाद, निझामाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे श्री साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.45 वाजता पोहोचतील.
2) गाडी संख्या 07418 श्री साईनगर शिर्डी – तिरुपती- (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर बुधवारी: ही गाडी दिनांक 7 एप्रिल पासून श्री साईनगर शिर्डी येथून दर बुधवारी रात्री 07.35 वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, नांदेड, निझामाबाद, सिकंदराबाद, गुंटकळ मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रात्री 10.10 वाजता तिरुपती येथे पोहोचतील.
3)गाडी संख्या 01404 कोल्हापूर ते नागपूर (द्वी-साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर सोमवारी आणि शुक्रवारी: ही गाडी दिनांक 12 मार्च पासून कोल्हापूर येथून दर सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी 12.45 वाजता सुटेल आणि मिरज, लातूर, परभणी, वाशीम, अकोला मार्गे नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12.00 वाजता पोहोचेल.
4)गाडी संख्या 01403 नागपूर ते कोल्हापूर (द्वी-साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी आणि शनिवारी: ही गाडी दिनांक 13 मार्च पासून नागपूर येथून दर मंगवारी आणि शनिवारी दुपारी 03.15 वाजता सुटेल आणि मिरज, लातूर, परभणी, वाशीम, अकोला मार्गे कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 02.00 वाजता पोहोचेल.