# भारतातील संगणक अभियंत्यांची मानसिकता -प्रा.डॉ. वृषाली राऊत.

बंगळुरू सिलीकॉन व्हॅलीची ओळख सुसाईड कॅपीटल..?

एसी मध्ये काम म्हणजे आराम असा विचार करणाऱ्या भारतीयांना ज्या इमारतीत ते बसतात त्यांना Sick Building असं नाव WHO ने दिले असून, ज्या इमारतींमध्ये पुरेशी मोकळी हवा व प्रकाश नसतो त्यात काम करणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळे आजार होतात. भारतातील काचेच्या इमारतीत जे संगणक अभियंते काम करतात त्यांना वारंवार सर्दी होणे, त्वचा व केस ह्याच्या समस्या, सतत कसला तरी संसर्ग होणे अशी लक्षण दिसतात. बंगळुरू हे अत्यंत चांगल्या भारतीय शहरांपैकी एक असं शहर ज्याला गार्डन सिटी म्हणजे बगीच्यांच शहर म्हणून ओळख होती. मात्र, त्याला गेल्या काही वर्षात बंगळुरू Suicide Capital  म्हणून ओळखलं जात आहे.

बंगळुरू हे अत्यंत चांगल्या भारतीय शहरांपैकी एक असं शहर ज्याला गार्डन सिटी म्हणजे बगीच्यांच शहर म्हणून ओळख होती. मात्र, त्याला गेल्या काही वर्षात बंगळुरू Suicide Capital  म्हणून ओळखलं जात आहे. भारतीय संगणक उद्योगात बंगळुरू शहराला भारताचं Silicon Valley म्हणून ओळख आहे. मात्र, ह्याच संगणक उद्योगामुळे बंगळुरू सह पुणे, हैदराबाद सारख्या शहरांची संस्कृती कमालीची बदलली. हा वेग साधारण भारतीयाच्या सहन करण्याच्या पलीकडचा होता. गेल्या १५ वर्षात औद्योगिकरणाने स्थलांतर व्हायला सुरवात होऊन स्थलांतरित तरुण-तरुणी घरापासून दूर परक्या शहरात कुटुंबापासून दूर राहून परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी करायला लागले. हा अचानक आलेला बदल हाताळणं हे शरीर व मन दोन्हीसाठी कठीण होतं व हे बदल सांभाळून नोकरी करणारे संगणक अभियंता हे जरी दिसायला आनंदी दिसत असले तरी कमालीचा ताण, एकटेपणा, शारीरिक दुखणी व भावनिक त्रास घेऊन आयुष्य जगतात. ह्याला काही अपवाद पण आहेत पण  साधारणतः संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये एकाच प्रकारचे आजार दिसून येतात.

The National Institute of Mental Health and Neurosciences म्हणजे NIMHANS ह्या संस्थेतील तज्ज्ञ ह्यांच्याकडे गेल्या काही वर्षात संगणक अभियंते ताण संबंधित तक्रारी घेऊन येण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.

हे वाचा

https://www.rediff.com/news/2008/feb/14spec.htm

एका सर्वेक्षणानुसार बंगळुरू मधील संगणक उद्योग वर्षाला २४,००० करोड चा तोटा सहन करतो ज्याचं कारण कर्मचार्‍यांची चुकीची जीवनशैली व अनारोग्यदायी सवयी आहेत.

https://scroll.in/article/906412/bengaluru-it-sector-loses-rs-24000-crore-a-year-because-of-workers-poor-health-lifestyle-habits

आपण जे काही काम करतो त्याचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. शरीराची व मनाची झीज होते (wear & tear of body as well mind) व ह्याला occupational hazards म्हणजेच कामामुळे जाणवणारे आरोग्याचे धोके अस नाव आहे. International Labor organization ह्या कामगार व कर्मचारी ह्यांच्यासाठी काम करणार्‍या संघटनेने एखाद्या कामामुळे होणारे आरोग्याचे धोके जाणून घेण्यासाठी एक तक्ता ज्याला Job Safety Analysis म्हणतात सुचविला आहे. मात्र, भारतात काही क्षेत्रं सोडली तर बहुतेक क्षेत्रात हा तक्ता वापरत नाहीत व ह्या तक्त्यांनुसार फक्त शारीरिक धोके हे तपासले जातात. मात्र, मानसिक धोके जे तितकेच किंबहुना जास्त जीवघेणी आहेत ती कुठेही लिहिली किंवा शोधली जात नाहीत.

या तक्त्यात जर मानसिक धोके लिहायला गेलात तर त्यात कमालीचा ताण, नोकरीच्या अस्थिरतेमुळे येणारी चिंता, व अनेक नकारात्मक भावनांचे शरीरावर होणारे परिणाम ज्यात उच्च रक्तदाब, रक्तातील साखर, औदासीन्य, प्रजनन क्षमतेशी संबंधित आजार, स्त्रियांमध्ये पाळीच्या समस्या जसे PCOS/PCOD, थायरॉईड सर्रास आढळून येतात. सतत मशीन च्या सानिध्यात राहिल्याने संयम कमी होऊन मानवी नात्यांवर त्याचा परिणाम जाणवतो. भावनिक बधिरता ज्यात भावना कमी जाणवणे  हा सुद्धा प्रकार जी लोक बरीच वर्ष काम करत आहेत त्यांना जाणवतो. मी फक्त एकच जॉब प्रोफाइल चे धोके लक्षात घेतले आहेत. इतर जॉब प्रोफाइल साठी या सोबत इतर धोके पण आहेत.

एका जागी कम्प्युटर वर काम करून तब्येत खराब होऊ शकते हे भारतीयांना न पटणारं आहे. १९९२ च्या सुमारास जेव्हा भारतात संगणक उद्योगाने जोर धरायला सुरवात केली त्या वेळेस हा उद्योग इतका जोर धरेल ह्याची कुणालाही कल्पना नव्हती. ४६ लाखाच्या वर कर्मचारी असणार्‍या ह्या उद्योगाचा आवाका प्रचंड मोठा असून स्वस्त पण कुशल मनुष्य बळ जे परदेशी कंपन्यांना मुबलक व वेळेवर मिळाल्याने भारतात हा उद्योग अति वेगाने फोफावला. मात्र, ह्या अश्या बैठ्या कामातून शरीरावर होणारे दुष्परिणाम भारतीयांच्या लक्षात यायला २० वर्षे गेली.

हे वाचा

https://www.hindustantimes.com/columns/the-great-indian-disconnect-between-politics-and-economics/story-spdpb51jd6dVBp8AyOa0BL.html

एसी मध्ये काम म्हणजे आराम असा विचार करणाऱ्या भारतीयांना ज्या इमारतीत ते बसतात त्यांना Sick Building असं नाव WHO ने दिले असून, ज्या इमारतींमध्ये पुरेशी मोकळी हवा व प्रकाश नसतो त्यात काम करणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळे आजार होतात. भारतातील काचेच्या इमारतीत जे संगणक अभियंते काम करतात त्यांना वारंवार सर्दी होणे, त्वचा व केस ह्याच्या समस्या, सतत कसला तरी संसर्ग होणे अशी लक्षण दिसतात.

हे वाचा

https://www.forbes.com/sites/forbestechcouncil/2021/03/16/how-to-prepare-your-building-and-motivate-employees-to-return-to-the-workplace/?sh=e4cdd824a22c

ह्याच बरोबर बसण्याची व्यवस्था योग्य नसणे, पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे, कॅन्टीन मध्ये पोषक पदार्थ न मिळणं अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींनी सुद्धा शरीरावर व मनावर परिणाम जाणवतात. संगणक अभियंत्यांच मानधन हे डॉलर्स, पौंड्स, युरो मध्ये असल्याने व परदेशात जाऊन काम करण्याची संधी अशा गोष्टींमुळे संगणक उद्योगातील लोकांनी कामाची चुकीची पद्धत, त्यामुळे होणारे अति काम, जास्तीचे कामाचे तास, स्वत:च्या कुटुंबासाठी व स्वत: साठी वेळ न देणे ह्याकडे दुर्लक्ष्य केले. अति कामामुळे burnout हा प्रकार सर्रास आढळून येतो. burnout ही अत्यंत घातक अवस्था असते.

हे वाचा

https://www.who.int/news/item/28-05-2019-burn-out-an-occupational-phenomenon-international-classification-of-diseases

सतत इंटरनेट चा अति-वापर केल्याने पण संगणक अभियंत्यांना त्रास होतात. मेंदूतील भावनिक केंद्र ज्याला amygdala म्हणतात ते आपल्या मानवी उत्क्रांतिची देणगी आहे, amygdala हे भीतीवर काम करते व cortex हा मेंदूतील भाग तर्कशुद्ध विचार करतो. Amygdala ला भीती जाणवली (मानसिक किंवा शारीरिक) तर तो शरीर ला संदेश देतो की आता स्वत: च रक्षण करायला हवं, मग त्यानुसार मानवी शरीर एक तर त्या भीती वाटणाऱ्यापासून दूर जात किंवा भीती वाटणाऱ्या शी दोन हात करायला सज्ज होत, ह्याला flight/fight अस नाव आहे. शरीर ह्या भय अवस्थेत ताण अनुभवत असतं. इंटरनेट वर आपल्यावर आदळनाऱ्या असंख्य गोष्टी मनात भीतीची भावना सतत जागृत ठेवतात. तार्किक विचार करायला मेंदूला वेळच मिळत नाही कारण 24*7 वेगवेगळी मध्यम व त्यातून येणारी अखंड माहिती मेंदूत ट्रॅफिक जॅम करते. त्यामुळे आपलं शरीर व मेंदू सतत alert mode मध्ये राहून झोप कमी होते, blue light ने पण झोपेवर वाईट परिणाम होतो ज्यामुळे शरीरातील सगळ्या क्रिया बिघडतात व लठ्ठपणा वाढतो. अति प्रमाणात इंटरनेट वापरल्याने आपला stress response activate होऊन (fight/flight/freeze) cortisol हे stress हॉर्मोन्स ची पातळी वाढून blood pressure लागू शकत.

सतत एकाच ठिकाणी मान खाली घालून, बोट व मनगटाच्या अति हालचाली, चुकीची बसण्याची पद्धत यामुळे शारीरिक त्रास जसे carpal tunnel syndrome, body posture issues, headache, muscle problems व डोळ्यासमोर blue light यामुळे dry eyes, झोपेच्या समस्या सुद्धा संगणक अभियंत्यामध्ये आढळून येतात.

सतत च्या मशीन संपर्कामुळे संयम कमी होत जातो, संवेदना बोथट होतात, दुसर्‍याचं ऐकण्याची क्षमता कमी होते व मग लोक हाताळायला कठीण जात. मशीन वर काम करणार्‍यांचा emotional intelligence भावनिक बुध्यांक कमी होतो कारण प्रत्यक्ष संवाद साधताना चेहर्‍यावर चे हाव भाव, अशाब्दीक शारीरिक हालचाली व आवाज या सगळ्यांचा वापर करावा लागतो, तशी आपली शरीर रचना आहे पण आपली ही क्षमता मशीन वर खासकरुन मोबाइल, कम्प्युटर व लॅपटॉप वर हळूहळू लुप्त पावते. त्यामुळेच अशी मंडळी एकलकोंडी व चिडचीडी होत जातात.

हे बघा

https://www.independent.co.uk/life-style/gadgets-and-tech/excessive-internet-use-could-be-raising-your-blood-pressure-us-study-finds-a6685161.html

संगणक अभियंत्यांच काम हे बौद्धिक असल्याने त्याला सतत व वेगाने विकसित होणार तंत्रज्ञान ज्यामुळे सतत व नवीन शिकावं लागत अन्यथा स्पर्धेत टिकाव लागण मुश्किल असत. संगणक अभियंत्याचे शेल्फ लाईफ हे ४५ च्या वर नाही त्यामुळे अनेक जणांना पुढे काय करावं हे कळत नाही. शरीर व मन ह्यात तशी ऊर्जा न राहिल्याने, एका विशिष्ट आयुष्याची सवय पडल्याने सुद्धा काय काम करावं व कस पुढे जावं हा प्रश्न येतो. वेळेत समजून जी लोक पुढच्या गोष्टीसाठी कौशल्य विकसित करून योग्य वेळीच नवीन मार्ग निवडतात त्यांना पुढचा प्रवास सोपा पडतो. परंतु वाढलेले खर्च, पेन्शन नसणे, दिखाऊपणावरील होणारा खर्च ह्या सगळ्या गोष्टींचा वेगळाच त्रास असतो.

गेल्या काही वर्षात वाढलेले ऑटोमेशन च्या प्रकाराने अनेकांच्या नोकर्‍यांवर गदा आणली व त्यातून अनेकांनी आत्महत्येचा मार्ग निवडला.

हे वाचा

https://www.dw.com/en/suicides-highlight-plight-of-it-workers-in-india/av-39825560

मानव संसाधन विभागाने ज्या पद्धतीने संगणक क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी काम करायला हव होतं ते न केल्याने संपूर्ण संगणक उद्योगाला बराच फटका बसला आहे. Hiring व firing ह्या दोन गोष्टी सोडून एचआर ने इतर अत्यंत महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष द्यायला हवं. ज्यात प्रामुख्याने कर्मचार्‍याला कामावरून काढताना त्याच्या/तिच्या स्वाभिमान व स्व प्रतिमेला धक्का लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. कर्मचारी कामावरून काढतोय त्याच्या/तिच्या आयुष्यातून नाही हे जर भान ठेवलं तर अनेक आयुष्य वाचतील ह्याची एचआर ने नोंद घ्यावी. काम हा आयुष्यातील एक मुद्दा असून त्यामुळे संपूर्ण आयुष्य घालविणे हे चुकीचे आहे हे कर्मचार्‍यांनी समजावून घ्यावे ज्यामुळे त्रास होणार नाही.

कामातून येणारा ताण घालविण्यासाठी चुकीचे मार्ग न निवडता काही चांगल्या सवयी ज्यात व्यायाम, झोप व विश्रांती येते. संगणक उद्योगातील कर्मचारी संघटनानी (ज्यात NASSCOM पण येते) कर्मचार्‍यांच्या Well-Being चा विचार करावा कारण कर्मचारी हा/ही केवळ कर्मचारी नसून व्यक्ती, नागरिक, कौटुंबिक सदस्य असतो/असते त्यामुळे त्याच्या आरोग्याची जबाबदारी ही त्याच्या कंपनीची व त्या उद्योगाची सुद्धा असते.

मी स्वतः १३ वर्ष संगणक क्षेत्रात काम केले असून माझी स्वत:ची पीएच.डी. ही संगणक उद्योगाच्या व्यावसायिक आरोग्यावर आहे. माझ्या पीएच.डी. वर काही संगणक अभियंत्यांनी एक शॉर्ट फिल्म बनवली असून त्यात त्यांना आलेले अनुभव त्यांनी कथन केले आहेत.

हे बघा

https://www.youtube.com/watch?v=stbE3tZbYSA&t=18s

“It is more important to go slow and gain the lessons you need along the journey then to rush the process and arrive at your destination empty.”
― Germany Kent

-प्रा.डॉ.वृषाली रामदास राऊत
सहा. प्रा. औद्योगिक मानसशास्त्र,
विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
vrushali31@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *