# नांदेड-बेंगलोर, ओखा-रामेश्वर उत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ.

हजरत निझामुद्दीन-नांदेड दरम्यान होळी सुपर फास्ट विशेष गाडीच्या दोन फेऱ्या

नांदेड: उत्तर रेल्वे ने कळविल्या नुसार हजरत निझामुद्दीन-हुजूर साहिब नांदेड -हजरत निझामुद्दीन दरम्यान होळी उत्सव सुपर फास्ट विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे.

१.गाडी संख्या ०४०३८ ही विशेष गाडी हजरत निझामुद्दीन येथून दिनांक २५ मार्च  आणि दिनांक १ एप्रिल रोजी गुरुवारी रात्री २३.१५ वाजता सुटेल आणि भोपाल, अकोला मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री २१.४० वाजता पोहोचेल.

२.गाडी संख्या ०४०३९ ही विशेष गाडी हुजूर साहिब नांदेड येथून दिनांक २७ मार्च आणि ३ एप्रिल रोजी शनिवारी सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि अकोला, भोपाल मार्गे हजरत निझामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१०  वाजता पोहोचेल.

बंगलोर-नांदेड-बंगलोर नांदेड उत्सव विशेष गाडी आणि ओखा-रामेश्वर-ओखा उत्सव विशेष गाड्या प्रवाशांच्या सेवेत सुरु आहेत. या दोन्ही गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ते पुढील प्रमाणे:

३.गाडी संख्या ०६५१९ बेंगलोर ते हुजूर साहिब नांदेड उत्सव विशेष गाडीस

दिनांक ३० मार्च ते ३० जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

४.गाडी संख्या ०६५२० हुजूर साहिब नांदेड ते बंगलोर उत्सव विशेष गाडीस दिनांक १ एप्रिल  ते १ जुलै पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

५.गाडी संख्या ०६७३३ रामेश्वर-ओखा साप्ताहिक उत्सव विशेष एक्स्प्रेस ला दिनांक २ एप्रिल ते २५ जून  – १३ फेऱ्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

६.गाडी संख्या ०६७३४ ओखा -रामेश्वर साप्ताहिक उत्सव विशेष एक्स्प्रेस ला दिनांक ६ एप्रिल ते २९ जून दरम्यान १३ फेऱ्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *