# नांदेडमधील पोलिसांवर हल्ला; 400 जणांवर तीन गुन्हे दाखल.

18 जणांना अटक; आरोपींमध्ये गुरूद्वारा बोर्डाच्या अधीक्षकांसह सदस्यांचा समावेश

नांदेड: नांदेडमध्ये काल सोमवारी गुरूद्वारासमोर शिख बांधवांच्या हल्ला बोल मिरवणुकीस परवानगी नाकारली म्हणून तलवारी, लाठ्या काठ्याने पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. तसेच पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती. या हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी जिवे मारण्याच्या प्रयत्नासह सुमारे 400 जणांवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच एकूण 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या हल्यात पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या उजव्या हाताला फॅक्चर झाले आहे. पोलीस अंमलदार दिनेश पांडे हे गंभीर अवस्थेत आहेत. पोलीस अंमलदार अजय यादव हे सुध्दा जखमी आहेत. सोबतच अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार किरकोळ जखमी असल्याने त्यांनी याबाबत उपचार घेतलेला नाही. वजिराबाद पोलिसांनी या प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

एका गुन्ह्यात जवळपास 61 नावांसह 300 लोक अनोळखी आहेत. दुसर्‍या गुन्ह्यात 9 नावे आहेत त्यांच्यासोबतही 70 ते 80 अनोळखी लोकांचा उल्लेख आहे. पोलीस बॉईज संघटनेने कालच्या हल्ल्याबाबत निषेध व्यक्त करून हल्लेखोरांविरुध्द मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे. या तीन गुन्ह्यांपैकी गुन्हा क्रमांक 114 मध्ये गुरूद्वारा बोर्डाचे अधीक्षक आणि सदस्य यांना सुध्दा आरोपी करण्यात आले आहे.

पोलीस उपनिरिक्षक भाऊसाहेब शशिकांत मगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 मार्च रोजी त्यांची ड्युटी देना बँक चौक येथे असतांना त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार शिंदे, डोईवाड, उत्तकर, कंधारे, शिंदे, पवार, मुस्तफा, शिंगरे, पंदरे, केंद्रे, दुधभाते, इसान, महिला पोलीस अंमलदार वायकुठे, होमगार्ड वाघमारे, कांबळे, लोखंडे असे हजर असतांना गुरूद्वारापासून देना बँक चौकाकडे आलेल्या 70 ते 80 जणांच्या जमावाने आक्रमकपणे तेथे हजर असलेल्या पोलीसांच्या अंगावर तलवारी, भाले, काठ्या घेवून हल्ला केला. तेथे लावलेले बॅरिकेटस् तोडले. त्या ठिकाणी उभी असलेली बिलोली पोलीस उपअधीक्षकांची गाडी (एम.एच.26 आर.0705) फोडली. यावेळी शिंदे नावाचे पोलीस जखमी झाले. माझ्याही गळ्यावर तलवार लावली होती. पण मी त्यातून वाचलो.

माझ्यावर हल्ला करणार्‍या मंडळीमध्ये बलप्रितसिंघ उर्फ आशिष सपुरे, गुरमितसिंघ उर्फ बादल, देवेंद्रसिंघ महाजन, मनमोहनसिंघ उर्फ कुणालसिंघ राजेंद्रसिंघ नंबरदार, छोटा सरताज, नानकसिंघ बासरीवाले, ललन उर्फ लल्या भोलासिंघ, राजू धुपिया, जिंदर सुखवई आणि 70 ते 80 लोकांचा समावेश होता. वजिराबाद पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यात जिवे मारण्याच्या कलमासह अनेक कलमे आहेत. सोबतच हत्यार कायदा, पोलीस कायदा, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट अशा अनेक कायद्यातील कलमांचा समावेश आहे.

वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील प्रमुख सहायक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवार, दि.29 मार्च रोजी धुलीवंदनाच्या निमित्त बंदोबस्त करत असतांना गुरूद्वारासमोर पोलिसांचे मोठे पथक तैनात होते. त्यात अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, संदीप शिवले, सहायक पोलीस निरिक्षक रवी वाहुळे यांच्यासह पोलीस अंमलदार जाधव, टोणगे, राठोड, गजानन किडे, बबन बेडदे, नंदे, भालेराव, व्यंकट गंगुलवार, चंद्रकांत बिरादार, शरदचंद्र चावरे, महिला पोलीस अंमलदार कांचन कसबे, लांडगे, कुलते यांच्यासह साध्या वेशात अनेक पोलीस होते. दरम्यान, गुरुद्वारा गेट क्रमांक 1 तोडून कांही जणांनी हातात तलवारी, काठ्या, भाले घेवून बाहेर आले आणि पोलिसांवर हल्ला केला. त्यात विक्रांत गायकवाड, दिनेश पांडे, अजय यादव, मुदत्तसर अन्वर पठाण, गोविंद जाधव, शिवाजी परवतराव शिंदे यांना जखमी केले आहे.

या तक्रारीनुसार हल्ला करणारे  बलप्रितसिंघ उर्फ आशिष सपुरे, गुरमितसिंघ उर्फ बादल, देवेंद्रसिंघ महाजन, मनमोहनसिंघ उर्फ कुणालसिंघ राजेंद्रसिंघ नंबरदार, छोटा सरताज, नानकसिंघ बासरीवाले, ललन उर्फ लल्या भोलासिंघ, रणज्योतसिंघ जगिंदरसिंघ सुखोई, बलप्रितसिंघ चावला,मोनु बादलसिंघ, हरणेकसिंघ तोपची, रोनकसिंघ बलवंतसिंघ गाडीवाले, मन्नुसिंघ बलवंतसिंघ गाडीवाले, मोनुसिंघ बानसिंघ गाडीवाले, राजू मदनसिंघ बुंगई उर्फ किडा, सतनामसिंघ मनी, सुखा हुंदल, विक्की सुखा हुंदल, गब्बुग्रंथी, राजू महाजन, विक्की हंडी, जम्मू हंडी, राजू धुपिया, दिपसिंघ गुलाबसिंघ पाठी, बलबिरसिंघ उर्फ टिटू बुंगई, जोगी अवतारसिंघ पहरेदार, भजनसिंघ पहरेदार, मनिंदरसिंघ जसपालसिंघ लांगरी, बंटी ढिल्लो उर्फ पोंगा, अभिजित फोटोग्राफर, रविंदरसिंघ जंगी, जिंदरसिंघ सुखई, रोहित हरभजनसिंघ सेवादार, विक्रमसिंघ भजनसिंघ सेवादार, अवि रजू पुजारी, हरजित अरोरा, अवतारसिंघ गरेवाल, गोलू बोरगाववाले, मनसिजसिंघ रायके, मनजितसिंघ रायके, चन्नु सिरपल्लीवाले, जपिंदरसिंघ उर्फ जप्पी, लाडी रागी, मोनू रायके उर्फ ढक्का, लक्की चंदासिंघ हकीम, अमनदिपसिंघ शहा, हरप्रितसिंघ हकीम, बंटीसिंघ अमोलसिंघ ढिल्लो उर्फ कोगा, राज बेंगन, कमलजितसिंघ, परमजितसिंघ, सुखासिंघ भगवानसिंघ बावरी, शेरे पंजाब हॉटेलचा मुलगा, हरभजनसिंघ देवासिंघ पहरेदार, जसप्रितसिंघ हरभजनसिंघ सेवादार, जसविंदरसिंघ दिलपुर, रविंद्रसिंघ बुंगई, मनप्रितसिंघ कुंजिवाले, गुरमितसिंघ उर्फ राज महाजन, गुलाबसिंघ कंधारवाले, नौनिहालसिंघ जहागीरदार, देवेंद्रसिंघ मोटरांवाले अशा 61 नावांसह 300 ते 400 लोकांचा उल्लेख आहे. या गुन्ह्याचा तपास वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार हे करणार आहेत.

तिसरा गुन्हा यातही जिवे मारण्याच्या प्रयत्नासह अनेक कलमांचा उल्लेख आहे. या तिसर्‍या गुन्हेचे तक्रारदार विक्कीसिंघ गजाननसिंघ खालसा हे आहेत. त्यांनी नमुद केल्यानुसार मिरवणूक काढतांना संत बाबांना उलट सुलट बोलत असतांना तो संत बाबाजवळ थांबला होता. त्यावेळी त्यावर प्रकाशसिंघ झामसिंघ सेवादार, लखनसिंघ भोलासिंघ खालसा, बलप्रितसिंघ चावला, मोनुबावनसिंघ गाडीवाले यांच्यासह 60 ते 70 लोकांनी हल्ला करून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांना मारहाण केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे करत आहेत.

पोलिसांवरील हल्ला दुर्देवी, दोषींव कठोर कारवाई करु पालकमंत्री अशोक चव्हाण

पोलिसांवरील कांही समाज कंटकांनी केलेला हल्ला अत्यंत दुर्देवी असून या घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही. नांदेडमध्ये अशी घटना घडणे वाईट आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेतर्फे हल्लाबोल कार्यक्रम होवू नये यासाठी चर्चा करुन कार्यक्रम न करण्याचा निर्णय झाला होता. पोलीस प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बाबाजींनी सहकार्य करण्याचा शब्द दिला होता.  तथापि, हल्लाबोलमध्ये कांही समाज कंटकांनी पोलीसांवर हल्ल्याचे जे कृत्य केले त्या दोषींवर कठोर कारवाई करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या हल्ल्यातील जखमी पोलिसांची त्यांनी आस्थेने विचारपूस करुन त्यांना ज्या वैद्यकीय सुविधा लागतील त्या तत्काळ पुरविण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

दरम्यान, डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे त्यांनी कायदा व सुव्यवस्थाबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक घेवून त्यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरिक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *