# लसीकरण जनजागृती अभियानाचा शुभारंभ.

नागरी कृती समिती व परिवर्तन प्रतिष्ठानचा उपक्रम

नांदेड: माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या संकल्पनेतून काळाची गरज ओळखून नागरी कृती समिती व परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे शहरात लसीकरण जनजागृती अभियान राबविण्याचा घेतलेला निर्णय समाजपयोगी व प्रशंसनीय असल्याचे मत नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक निसार तांबोळी यांनी अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी मा. निसार तांबोळी म्हणाले, नागरी कृती समितीच्या लसीकरण जनजागृती अभियानामुळे शहरातील नागरीकांत जागृती निर्माण होईल. या अभियानामुळे नागरिकांनी लस घेणे ही लोक चळवळ बनेल व कोरोनापासून आपण सुरक्षित राहू असा विश्वास वाटतो असे मत त्यांनी व्यक्त केले. नागरी कृति समितीच्यावतीने लसीकरणाची जनजागृती करणाऱ्या आकर्षक व माहितीपूर्ण चित्ररथाचे उद्घाटन निसार तांबोळी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाण मास्कचा वापर करा, गर्दी टाळा, 6 फूट शारीरिक आंतर ठेवा, हात व तोंड साबनाने धुवा असे विविध संदेश ध्वनिक्षेपणाद्वारे देण्यात आले.

ध्वनिक्षेपणाद्वारे नारायणा हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज डॉ. व्यंकटेश काब्दे, छाती विकार तज्ज्ञ डॉ. मृत्युंजय महिंद्रकर, मधुमेह थायराईड तज्ज्ञ डॉ. आदिती काब्दे, मुत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुनील मसारे, मेंदुविकार तज्ज्ञ डॉ. पंकज राठी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्मिता भट्टड व डॉ. भारत तोष्णिवाल यांनी कोरोनाची लक्षणे, घ्यावयाची खबरदारी व उपायांची उपयुक्तता यावर माहिती देण्यात आली आहे. माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या संकल्पनेला कृतीत रूपांतर करण्याचे काम छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी केले, असे सांगितले.

यावेळी डॉ. व्यंकटेश काब्दे म्हणाले की,  नांदेड शहरात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे जनतेनी लस घेणे गरजेचे आहे. संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्याचा एकमेव शास्त्रीय मार्ग लसहाच आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत याबद्दल जागृती व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

लसीकरण जनजागृती अभियान यशस्वी करण्यासाठी नागरीकृती समितीचे समन्वयक डॉ. लक्ष्मण शिंदे, परिवर्तन प्रतिष्ठानचे डॉ. किरण चिद्रावार, डॉ. अशोक सिध्देवाड, डॉ. कुंजम्मा काब्दे, प्रा. डॉ. स्मीता भट्टड, डॉ. भट्टड, प्रा. के.एस. धुतमल, प्राचार्य डी.यु. गवई, प्रा. डॉ. अनिरुध्द बनसोडे, प्रा.डॉ. बोरीकर, श्री. बालाजी टीमकीकर इत्यादींनी परिश्रम घेतले. श्री. बुरांडे, छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी विशेष परिश्रम घेतले. हे जनजागृती अभियान दहा दिवस चालेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी केले तर आभार डॉ. स्मीता भट्टड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *