पुणे: पुणे शहर व परिसरात आज सोमवारी दुपारी सुमारे दोन तास मान्सूनपूर्व पाऊस बरसला. दुपारी अडीचच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळी साडेचारपर्यंत सुरू होता. हवामानशास्त्र विभागाकडे पुणे 16.6 मिमी. लोहगाव 40 व पाषाण 32 मिमी. अशी नोंद झाली आहे.
सकाळी आकाश निरभ्र होते. दुपारच्या सुमारास आकाशात ढग जमायला सुरूवात झाली. दुपारी दोनच्या सुमारास आभाळ भरून आले. दुपारीच अंधारून आल्यासारखे सायंकाळसारखे वातावरण झाले होते. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. हा पाऊस जवळपास दोन तास होता. या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होऊन पावसाळ्यासारखे वातावरण झाले होते. शहरात या पावसाची नोंद 16.6 मिमी. एवढी झाली आहे.