24 तासांत केरळमध्ये दाखल
पुणे: अनुकूल स्थितीमुळे येत्या 24 तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार असून, त्याचा पुढील प्रवास सुकर होणास सुरूवात झाली असून, महाराष्ट्रात तो 10 जूनच्या आसपास येईल, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोषक स्थिती नसल्यामुळे मान्सून लक्षव्दीप अंदमान आणि निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरात स्थिरावला होता. यंदा 31 मे रोजी तो केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता. मात्र, तोक्ते आणि यास या वादळामुळे मान्सूनची गती मंदावली. मान्सून पुढे सरकण्यास हवा असलेल्या हवेचे कमी दाबाचे पट्ट्यांची क्षमता कमी झाली होती. तसेच देशभर पूर्व मोसमी पावस बरसत आहे. त्यामुळे मान्सूनचे केरळच्या किनारपट्टीवरील आगमन 3 जूनपर्यंत लांबले.
बुधवार, 2 जून रोजी हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून 3 जून रोजी केरळमध्ये दाखल होत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गुरूवारपर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर सात दिवसात तळकोकणात येण्याची शक्यता आहे.