# चिमुकल्या अयांश गुप्ताच्या उपचारासाठी जमले १६ कोटी.

पुणे: स्पायनल मस्क्यूलर रेट्रोफी नावाच्या दुर्मिळ आजाराने पीडित अयांश गुप्ता या हैद्राबाद मधील लहान मुलाला  उपचार करण्यासाठी लागणारे 16 कोटी रुपये दानशुरांच्या क्राउड फंडिंग द्वारे जमले आहेत. आता परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या औषधावरील इंपोर्ट ड्यूटी (आयात करात) सरकारने सूट द्यावी,असे आवाहन कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी चे संस्थापक राकेश मित्तल, संस्कार पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापक सिद्धी मित्तल यांनी केले आहे

हैदराबादमध्ये दोन वर्षांच्या या  चिमुकल्याला स्पायनल मस्क्युलर रेट्रोफी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारावरील उपचारासाठी परदेशात एकच औषध उपलब्ध आहे आणि या औषधाची किंमत तब्बल १६ कोटी रुपये इतकी आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम जमा करणं कठीण होतं. तरीही त्यांनी सोशल मीडियावरून देशातील अनेकांनी मदतीचे आवाहन करुन मदत मिळवली आहे, असे राकेश मित्तल आणि सिद्धी मित्तल यांनी सांगितले. आता या औषधाच्या आयात करात सूट मिळाल्यास लवकरात लवकर हे उपचार सुरू होतील. व या आजारातून हा चिमुकला बरा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *