# दहावी मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम झोका ॲपवर.

‘झोका’मुळे मराठी शिक्षणाला डिजीटल झळाळी

पुणे: झोका…. घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाची गरज ओळखून हे ॲप तयार करण्यात आले. ‘शिक्षणाचा व्यापार नव्हे;  प्रसार’ अशी भूमिका घेऊन झोकाची वाटचाल सुरू असल्याची माहिती स्टार्ट अपचे संचालक दशरथ पाटील यांनी दिली. सर्वांना परवडेल अशी किंमत झोका ॲपसाठी निश्चित करण्यात आलीय. झोका ॲपवर शिक्षण आणि मनोरंजन दोन्ही गोष्टी मिळणार आहेत. सुरूवातीला मराठी माध्यमाचा इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम ॲपवर प्रसिद्ध करण्यात आलाय. लवकरच पाचवी ते दहावीचा संपूर्ण अभ्यासक्रमही झोकावर पाहायला मिळेल. ॲपचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे पाचवी आणि आठवी या स्कॉलरशीप परीक्षांचे मार्गदर्शन मोफत केले जाणार आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षांचा प्रदिर्घ अनुभव असलेले तज्ज्ञ शिक्षक अध्यापन करणार आहेत. झोका ॲप हे  प्ले स्टोअरवर उपलब्ध असून राज्यात मराठी माध्यमांत शिकणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन झोकाच्या व्यवस्थापन टीमने केले आहे.

झोका ॲपच्या निर्मितीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील संवेदना फाऊंडेशनच्या सदस्यांनी पुढाकार घेतलाय. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळं झोकाच्या निर्मितीमागे रोजगार निर्मिती ही प्रमुख प्रेरणा राहिली आहे. गेली वर्षभर शाळा बंद असल्याने खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.  त्यात भर म्हणजे मराठी माध्यमांत दर्जेदार ऑनलाईन शिक्षण देणारे पर्यायच उपलब्ध नाहीत. शिवाय इंटरनेट विषमतेमुळे शिक्षण प्रक्रियेत अडथळे येत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता झोका ॲप मराठी शिक्षणाला नवी दिशा देणार आहे, हे नक्की. झोका ॲपच्या निर्मितीमुळं आजघडीला जवळपास १५ लोकांना रोजगार मिळालाय. यामध्ये व्हिडिओ एडिटर, ग्राफीक आर्टिस्ट, कॅमेरामॅन, शिक्षक, टाईपरायटर्स, निर्मिती सहाय्यक अशा विविध पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. येत्या वर्षभरात किमान शंभर जणांसाठी रोजगारनिर्मिती करण्याचा झोका टीमचा मानस आहे. या ॲपच्या निर्मितीसाठी फाऊंडेशनचे सुमारे १०० सदस्य सरसावले आहेत. त्यांनी बिनशर्त निधी उभा करून रोजगार निर्मितीसाठी योगदान दिले आहे.

राज्यातील प्रतिभावंत शिक्षक, कलाकार, व अभियंत्यांच्या संघटित शक्तीतून झोका ॲपचा जन्म झालाय. मायमराठीला वंदन करून ज्ञानसाधनेचा नवा मार्ग महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत आहे. केवळ शालेय शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकासाला पूरक ठरेल असा आशय ॲपवर आहे. मराठीतील दर्जेदार साहित्य ध्वनिमुद्रीत करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासाला जिवंत करण्यात आले आहे. माहिती व तंत्रज्ञानाला मातृभाषेत सोप करून सांगण्यात आलंय. वैदिक गणित, स्पोकन इंग्लिश, मोडी लीपी, करियर समुपदेशन, पालकत्व अशा अनेक गोष्टी झोका ॲपवर आहेत. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या गरजा ओळखून माहितीचा मोठा खजिनाच झोका ॲपवर उपलब्ध करण्यात आलाय. झोका ॲॅप हे संपूर्ण कुटुंबासाठी एक परिपूर्ण ॲप ठरणार आहे. सुमधुर आवाजात भजन व किर्तनही त्यावर ऐकायला मिळेल. कला, साहित्य आणि संस्कृतीची जोपासना आणि त्यांच्या समृद्धीकरणाचे स्वप्नं झोकाने दाखवले आहे. भविष्यात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमांतून ६४ कलागुणांच्या विकासासाठी प्रयत्न केले  जाणार आहेत. यासोबत एका ॲनिमेशन कंपनीचं स्वप्न पाहण्यात आलंय. इच्छुक विद्यार्थ्यांना ॲनिमेशनची कौशल्ये मोफत शिकवण्यात येत आहेत. कौशल्य विकासाच्या दृष्टीनेही झोकाने मोठे संकल्प उराशी बाळगले आहेत अशी माहिती संचालक दशरथ पाटील यांनी दिलीय.  शिक्षणाच्या क्षेत्रात देशात सध्या अनेक बड्या कंपन्यांनी हातपाय पसरलेत. पण त्यांचा हेतू शुद्ध व्यापारी आहे. झोका ॲप मात्र शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहणार असून त्यासोबत रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध राहणार आहे.

ॲपसाठी वार्षिक फी अतिशय माफक ठेवण्यात आलीय. पण त्यातूनही आर्थिक स्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ॲप सेवा मोफत देण्याचाही विचार आहे. शिक्षणाच्या बाबतील महाराष्ट्र हा नेहमी देशासाठी दिशादर्शक ठरलेला आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, टीळक, आगरकर, महर्षी कर्वे, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील अशा महान लोकांनी देशाच्या शिक्षणव्यवस्थेला निर्णायक वळण दिलेलं आहे. आजच्या डिजीटल युगात झोका ॲप देखील ऑनलाईन शिक्षणाच्या क्षेत्रात एक सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. अतिशय अल्प किमतीत दर्जेदार अशा शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याने मराठी माध्यमाच्या शिक्षणात क्रांती होणार आहे. आगामी काळात झोका ॲप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवून माय मराठीच्या सेवेसाठी अविरत कार्यरत राहणार असल्याची भावना व्यवस्थापन टीमनं बोलून दाखवली. झोका हे केवळ शैक्षणिक ॲप नसून, ते शैक्षणिक चळवळ म्हणून स्थापित व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. झोकाबद्दल अधिक माहिती Zoka.co.in या संकेत स्थळाला भेट देवून घेता येईल. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी या ॲपचे स्वागत  केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *