मुंबई: आज राज्यात कोरोनाबाधित ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज गुरूवारी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६, पुणे येथील ५, नवी मुंबई येथे १, नंदूरबार येथे १ आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात ८ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही, उर्वरित १२ मृत्यूंपैकी ७ रुग्णांमध्ये (५८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ४२०५ (१६७)
ठाणे: ३४ (२)
ठाणे मनपा: २१४ (४)
नवी मुंबई मनपा: ९७ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: १२४ (३)
उल्हासनगर मनपा: २
भिवंडी निजामपूर मनपा: ८
मीरा भाईंदर मनपा: ११६ (२)
पालघर: २१ (१)
वसई विरार मनपा: १०९ (३)
रायगड: १४
पनवेल मनपा: ३६ (१)
*ठाणे मंडळ एकूण: ४९८० (१८७)*
नाशिक: ४
नाशिक मनपा: ७
मालेगाव मनपा: १०९ (९)
अहमदनगर: २४ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: ४ (१)
धुळे मनपा: १३ (१)
जळगाव: ६ (१)
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ७ (१)
*नाशिक मंडळ एकूण: १८४ (१६)*
पुणे: ४१ (१)
पुणे मनपा: ८१२ (५९)
पिंपरी चिंचवड मनपा: ५७ (२)
सोलापूर: १
सोलापूर मनपा: ३२ (३)
सातारा: २० (२)
*पुणे मंडळ एकूण: ९६३ (६७)*
कोल्हापूर: ६
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २५
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ७ (१)
*कोल्हापूर मंडळ एकूण: ४३ (२)*
औरंगाबाद:०
औरंगाबाद मनपा: ४० (५)
जालना: ३
हिंगोली: ७
परभणी: ०
परभणी मनपा: १
*औरंगाबाद मंडळ एकूण: ५१(५)*
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: १
*लातूर मंडळ एकूण: १३*
अकोला: ११ (१)
अकोला मनपा: ९
अमरावती: ०
अमरावती मनपा: ७ (१)
यवतमाळ: १७
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
*अकोला मंडळ एकूण: ६९ (३)*
नागपूर: २
नागपूर मनपा: ९८ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: १०३ (१)*
*इतर राज्ये: २१ (२)*
*एकूण: ६४२७ (२८३)*